September 17, 2024

पुणे: वाहनांची तोडफोड करणार्‍या सराईत गायकवाड टोळीविरुद्ध मोक्का, शहरातील विविध भागात माजविली होती दहशत

पुणे, दि. १६/०७/२०२३: सहकारनगर परिसरात दहशत माजवित वाहनांची तोडफोड करणार्‍या सराईत टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. टोळीविरुद्धा विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी टोळीवर मोक्कानुसार केलेली ही ३६ वी कारवाई आहे.

सिध्दार्थ विजय गायकवाड, वय २२ रा.अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर, ( टोळी प्रमुख) राम राजाभाऊ उमाप, वय २३ सनी ऊर्फ किरण कैलास परदेशी वय २७ अमोल ऊर्फ नाना जालिंदर बनसोडे, वय ३१ समीर रज्जाक शेख वय २३ राजाभाऊ ऊर्फ जटाळया लक्ष्मण उमाप वय ५० गणेश ऊर्फ भुषण कैलास परदेशी वय ३० नब्बा ऊर्फ नरेश सचिन दिवटे वय २६ हर्षद आप्पा ढेरे, वय २२ शुभम ऊर्फ डुई अनिल ताकतोडे, वय १९ विशाल शिवाजी पाटोळे, वय १९ चेतन महादेव कांबळे वय २६ गौरव अरविंद नाईकनवरे, वय २२ अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

सराईत गायकवाड टोळीविरुद्ध १४ गुन्हे केल्याची नोंद आहे. टोळीचा सुत्रधार सिद्धार्थने साथीदारांच्या मदतीने गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व आर्थीक फायदयासाठी यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने गुन्हे केले आहेत. सहकारनगर, भारती विदयापीठ, स्वारगेट, दत्तवाडी,कोंढवा,मार्केटयार्ड, बिबवेवाडी भागात टोळी सक्रीय असल्याचे दिसून आले. टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव सहकारनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यावतीने अपर आयुक्त प्रविणकुमार पाटील यांना सादर केला. गुन्हयाचा तपास एसीपी नारायण शिरगावकर करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी नारायण शिरगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे पोलीस निरीक्षक, संदिप देशमाने, अंमलदार संजय गायकवाड, मंगेश खेडकर, पुजा तिडके, भाऊसाहेब आहेर यांनी केली.

आतापर्यंत ३६ टोळयाविरूद्ध मोक्का: पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष ठेउन कारवाईचा बडगा उगारला आहे. शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत त्यांनी ३६ टोळ्याविरुद्ध कारवाई करीत बडगा उगारला आहे.

टोळीने हे केले आहेत गुन्हे: स्वतःची संघटीत टोळी तयार करून, हिंसाचाराची धमकी देवुन किंवा दपटशहा दाखविली. सहकारनगर, भारती विदयापीठ, स्वारगेट, दत्तवाडी, कोंढवा, मार्केटयार्ड, बिबवेवाडी पोलीस ठाणे हद्दीत दरोडा, जबरी चोरी, प्राण घातक शस्त्र जवळ बाळगणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून, लोकांमध्ये हल्ले करून, घातक शस्त्र जवळ बाळगणे, नागरीकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, आपल्या टोळी सदस्यांकडुन गुन्हे घडवुन आणणे व दहशत निर्माण करणे, पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी काढलेल्या आदेशांचा भंग केले आहेत.