पुणे, २८/०१/२०२५: पुणे शहर व परिसरात गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजाराचे एकूण १०० हून अधिक रुग्ण आढळून आले असून या आजाराबाबत प्रशासनाने खबरदारी घेत पिंपरी चिंचवड येथील रुग्णांना वायसीएम रुग्णालय तर पुणे शहरातील कमला नेहरू रुग्णालय येथे गुलेन बारी सिंड्रोम जीबी आजारातील रुग्णांना मोफत उपचार देण्यात येणार आहे.महापालिकेच्या कमलानेहरू रुग्णालयात याबाबत संपूर्ण तयारी देखील करण्यात आली असून ४५ बेड च वॉर्ड तयार करण्यात आलं आहे.
याबाबत कमलानेहरू रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत बोठे म्हणाले की पुण्यातील कमला नेहरू रुग्णालय येथे गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजारासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे.कमलानेहेरू रुग्णालय येथे ४५ बेड ची व्यवस्था करण्यात आली आहे.यात १५ बेड पुरुषांसाठी तर १५ बेड महिलांसाठी आणि १५ आयसीयू बेड उपलब्ध करण्यात आले आहे.सध्या कमलानेहरू रुग्णालय येथे गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजाराचे एकही रुग्ण नसून आपण इथ शासनाने दिलेल्या आदेशावरून रुग्णांना मोफत उपचार देण्यात येणार असल्याच यावेळी बोठे यांनी सांगितल.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही