पुणे, 6 स्पत्तेंबर 2023: एशियन ऑर्थो स्पाइन क्लिनिक (एओएससी) आणि बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन (बीएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त विनामूल्य मूल्यांकन आणि फिजिओ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार,8 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत एशियन ऑर्थो स्पाइन क्लिनिक, अक्षय कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, आयटीआय रोड, पुष्पक पार्क कॉर्नर, औंध, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामध्ये सहभाग घेणार्यांसाठी नोंदणी करणे आवश्यक असून 9527997575 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करता येणार आहे.
संधिवात, ऑर्थो समस्या, पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, टाचदुखी, स्नायू दुखणे, मज्जातंतू दुखणे, शस्त्रक्रियेनंतरचे दुखणे आणि इतर तत्सम समस्या, ऑस्टियोपोरोसिस जॉइंट्स पेन, पाठ दुखणे, टाच दुखणे, सांधे दुखणे यासारख्या समस्या असणार्या व्यक्तींना या शिबिराचा लाभ होणार आहे. शिबिरात पुणे आणि पीसीएमसी विभागातील गरजू रुग्णांना सवलतींचा लाभ घेता येईल.
या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या टीममध्ये फिजिओथेरपिस्ट डॉ. सानिया पालकर, फिजिओथेरपिस्ट डॉ रुतुजा बुटे, फिजिओथेरपिस्ट डॉ.साधना शर्मा,मुख्य फिजिओ एन पुनर्वसन सेवा डॉ.जैनी शहा, क्रीडा आणि मानसशास्त्रीय सल्लागार शिल्पा धूत, संचालक -सल्लागार सीएचआर वेदना सेवा डॉ. प्रिया राठी, रेडिओलॉजी युनिटच्या संचालिका डॉ मनीषा हदगावकर, पॅथॉलॉजी युनिटच्या प्रमुख डॉ.आसावरी मांजरेकर, पोषण आणि डब्ल्यूटी नुकसान विशेषज्ञ संजीवनी मुसळे,ऑर्थो आणि ट्रॉमा सर्व्हिसचे संचालक डॉ.चेतन पुराम,ऑर्थो आणि स्पाइन सर्व्हिस चे संचालक डॉ शैलेश हदगावकर, बीएमए चे संस्थापक डॉ राजेश देशपांडे यांचा समावेश आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही