पुणे, १३/०६/२०२३: बेकायदेशिरित्या पिस्तुल बाळगणार्या एकाला सिंहगडरोड पोलिसांनी धायरी येथील चव्हाण शाळेजवळून अटक केली. त्याच्याकडे केलेल्या झडतीत पोलिसांनी एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
तनय गुरुनाथ तोडकर (वय 21 वर्षे रा. नरेद्र कॉम्प्लेक्स प्लॅट नं 9 बेनकर वस्ती धायरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
सिंहगडरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अमंलदार राजाभाऊ वेगरे, अमित बोडरे व अमोल पाटील यांना धायरी येथील चव्हाण शाळेजवळ एकजण संशयास्पदरित्या थांबलेला असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांना याबाबची माहिती देऊन पथकाने चव्हाण शाळेकडे धाव घेतली. तेथे अमंलदाराची आणि तोडकरची नजरा नजर होताच तो नजर चुकवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याला नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव तनय तोडकर त्याची झडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असल्याचे आढळून आले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे निरीक्षक जयंत राजुरकर, सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, उप निरीक्षक गणेश मोकाशी, सहायक पोलिस फौजदार आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, विकास पांडोळे, विकास बांदल यांचे पथकाने ही कारवाई केली.
More Stories
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर
पुणे: पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! मिसाळ विरोधक भिमालेंनी महापालिकेत केला अर्ज
तुम्ही यांना विधानसभेत पाठवा; पक्ष करताच पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर