July 24, 2024

पुणे: पीएमपीएमएल ची पर्यटन बससेवा आता फक्त ५०० रूपयांत

पुणे, २/०५/२०२३: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर व १६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता वातानुकूलीत ई-बसेसव्दारे विशेष बससेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दिनांक ०१/०५/२०२३ पासून सुरू करण्यात आलेली आहे.

तथापि, सदरील पर्यटन बससेवेस प्रवासी नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्याने व पर्यटन बससेवेचे तिकीट दर जास्त असलेबाबतच्या भावना नागरिकांनी सोशल मिडीयावर व्यक्त केल्याने परिवहन महामंडळाचे मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी पर्यटन बससेवेच्या तिकीट दरात बदल करणेचा निर्णय घेतला आहे. सर्व पर्यटन बससेवेच्या मार्गांवर तिकीट दरामध्ये सुधारणा करून प्रति प्रवासी तिकीट दर रूपये ५००/- इतका करण्यात आला आहे.

पर्यटन बससेवेचे मार्ग व सुधारित तिकीट दर खालीलप्रमाणे

 पर्यटन बससेवा क्र. १
 मार्ग – हडपसर, मोरगांव, जेजूरी, सासवड, हडपसर.
 पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये १,०००/-
 सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

 पर्यटन बससेवा क्र. २
 मार्ग – हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर.
 पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये १,०००/-
 सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

 पर्यटन बससेवा क्र. ३
 मार्ग – डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन.
 पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये १,०००/-
 सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

 पर्यटन बससेवा क्र. ४
 मार्ग – पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण, पुणे स्टेशन.
 पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये १,०००/-
 सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

 पर्यटन बससेवा क्र. ५
 मार्ग – पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणेस्टेशन.
 पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ७००/-
 सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

 पर्यटन बससेवा क्र. ६
 मार्ग – पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई, श्री क्षेत्र तुळापूर त्रिवेणी संगम, छ. संभाजी महाराज समाधीमंदिर (वढू बुद्रुक), रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन.
 पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये १,०००/-
 सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

 पर्यटन बससेवा क्र. ७
 मार्ग – भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी (शिरगांव), देहूगांव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्तीनिगडी.
 पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ७००/-
 सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पीएमपीएमएल पर्यटन बससेवेबाबत इतर माहिती खालीलप्रमाणे

1. बसेसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये १०० टक्के सवलत देण्यात येईल.

2. परिवहन महामंडळाचे १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) कात्रज, ५) हडपसर गाडीतळ, ६) भोसरी बसस्थानक, ७) निगडी, ८) मनपा भवन या पास केंद्रावर सदरील बससेवेचे तिकिट बुकींग करण्यात येईल.

3. सदरील बससेवेस ज्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभेल तसेच काही अपरिहार्य कारणास्तव सदरची बससेवा रद्द झाल्यास त्या प्रवाशांना इतर दिवशी (त्यापुढील आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी) प्रवास करण्याची
मुभा राहील.

4. सदरील बससेवेचे ज्या दिवशी बुकींग केले असेल त्या दिवशी सदर प्रवासास राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत व सायंकाळी पोहचल्यानंतर त्यांना त्यांच्या राहत्या घरापर्यंत सदरील तिकिटावर अन्य मार्गाच्या बसेसमधून प्रवास करण्याची मुभा राहील.

5. प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रत्येक बसमध्ये गाईड सेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुरू करण्यात येत असलेल्या पर्यटन बससेवेचा लाभ भक्तगण, भाविक व पर्यटक यांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.