September 17, 2024

पुणे: दहशत माजविणार्‍या सराईतविरूद्ध स्थानबध्दतेची कारवाई, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचा दणका

 पुणे, दि. १३/०२/२०२३ –  शहरातील भारती विद्यापाठ, सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या सराईताविरूद्ध एमपीडीएनुसार एक वर्षांसाठी नाशिक कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीनुसार केलेली ही चौथी कारवाई आहे.

अजिंक्य संतोष काळे (वय २१, गणेशनगर, आंबेगाव पठार) असे कारवाई  केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्यावर  वेगवेगळ्या स्वरूपाचे  ६ गुन्हे दाखल आहेत.

सराईत अजिंक्यने पिस्तुल, चाकू, कोयता हत्यारांचा वापर करून नागरिकांना दुखापत करणे, जबरी चोरी, दंगा, हत्यार बाळगणे असे गुन्हे केले आहेत. त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची  करण्याचा प्रस्ताव तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी पाठविला होता. त्यानुसार पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची एमपीडीएनुसार सराईत अजिंक्यविरूद्ध स्थानबद्धतेची कारवाई केली.