पुणे, ०४/०४/२०२३: जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या भिगवन पोलीस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून आरोपीस रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी आरोपी पोलीस कर्मचाऱ्या विरोधात भिगवण पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदास लक्ष्मण जाधव असे आरोपी पोलीस हवालदाराचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या शेताच्या वादावरून भिगवण पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोलीस हवालदार रामदास जाधव याने २५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत पुणे एसीबीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर, सदर तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांचे बरोबर चर्चा करुन पोलीस हवालदार रामदास जाधव यानी प्रथम २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. नंतर तडजोडीअंती २० हजार रुपये लाचेची मागणी केली म्हणून त्याच्यावर लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.पुणे एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले याबाबत पुढील तपास करत आहेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही