पुणे, दि. २१/०९/२०२३: झोमॅटो डिलव्हरी बॉयकडून ऑर्डर घेउन त्याचे पैस न घेता लुट करणार्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १२ सप्टेंबरला रात्री दीडच्या सुमारास फुरसुंगीत घडली आहे. अरूण दिगंबर राऊत वय २० कुणाल कैलास गायकवाड वय २० दोघेही रा. पवार आळी फुरसुंगी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आरोपींनी झोमॅटो ऑनलाईन जेवन मागवून, ऑर्डर उशीरा का आली, तुला पैसे देणार नाही असे बोलून मागविलेले जेवनाची ऑर्डर घेवून, पैसे न देता फिर्यादीचे खिशातील पाच हजारांची रोकड हिसकावून घेतली. अंमलदार प्रशांत दुधाळ व अमोल दणके यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेउन १० हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके , पोलीस निरीक्षक संदीप शिवले, एपीआय विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सुशील लोणकर यांनी केली.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही