पुणे, ०४/०७/२०२३: दुचाकीला पुढे जाण्यास वाट न दिल्याने तिघांनी एका रशियन दाम्पत्याला बेदम मारहाण केली. कोरेगाव पार्क भागात ही घटना घडली.
या प्रकरणी दुचाकीवरील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका रशियन नागरिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मूळचे रशियाचे आहेत. ते नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्यास असून एका खासगी कंपनीत सल्लागार आहेत. पादचारी रशियन नागरिक कोरेगाव पार्क भागातून निघाला होता. त्या वेळी दुचाकीस जागा न मिळाल्याने दुचाकीवरील तिघांनी रशियन नागरिकाशी वाद घातला. तरुणांनी रशियन नागरिकाला मारहाण केली. त्या वेळी रशियन नागरिकाच्या पत्नीने मध्यस्थी करणाचा प्रयत्न केला. तेव्हा तिघांनी रशियन महिलेला धक्काबुक्की केली.
आरोपी दुचाकीवरुन पसार झाले आहे. कोरेगाव पार्क पोलिसंनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन