पुणे, ०२/०९/२०२३: शिवाजीनगर दिवाणी न्यायालयातील बेलिफला एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी पकडले.
लक्ष्मण नथू काळे (वय ४०) असे लाचखोर बेलिफाचे (न्यायालयीन कर्मचारी) नाव आहे. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी काळे याच्यासह आाणखी एकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेने जमिनीच्या वादासंदर्भात शिवाजीनगर न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यात प्रतिवादी व्यक्तीला न्यायालयाने हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्याची जबाबदारी बेलिफ लक्ष्मण काळे याच्याकडे सोपविण्यात आली होती. समन्स वेळेत बजावून याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी काळे याने महिलेकडे एक हजार रुपयांची लाच मागितली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात सापळा लावून काळे याला महिलेकडून एक हजार रुपयांची लाच घेताना पकडले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
More Stories
पुणे: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टफोन आणि संगणक प्रशिक्षण
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना डांबले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘दगडूशेठ’ गणपतीची सांगता मिरवणूक दुपारी ४ वाजता मार्गस्थ