पुणे, १०/०३/२०२३: शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला पोलिसांनी पाठलाग करुन हडपसर भागात पकडले.
कृष्णासिंग उर्फ भुऱ्या भारतसिंग बावरी (वय २०, रा. पोते वस्ती, अशोकनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. बावरीला येरवडा पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तडीपार केल्यानंतर तो शहरात फिरत होता. हडपसरमधील सातवनगर भागात तो त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या वानवडी पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला पाठलाग करुन पकडले.
तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्या प्रकरणी बावरीला अटक करण्यात आली. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयवंत जाधव, उपनिरीक्षक रवींद्र लंभाते, ज्योतिबा कुरळे, संतोष काळे, किशोर राणे, राहुल गोसावी, पंढरी इंगळे, महेश गाढवे आदींनी ही कारवाई केली.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान