पुणे, १९/०४/२०२३: सिंहगड रोड परिसरातील आनंदनगर याठिकाणी एका सोसायटीत चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस शिरून पाच फ्लॅटचे कडी कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत एक फ्लॅट कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरी करण्यात चोरटे यशस्वी झाले असून त्यांनी चार लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नीलिमा अनिल देशपांडे (वय- 65, रा. आनंदनगर ,पुणे )यांनी अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे .सदरचा प्रकार 17 एप्रिल रोजी दुपारी तीन ते 18 एप्रिल संध्याकाळी साडेनऊ या दरम्यान घडला आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या कामानिमित्त कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात आरोपीने त्यांच्या राहत्या घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला, त्यानंतर बेडरूम मधील कपाटातील लॉक तोडून चोरट्याने 142 ग्रॅम सोन्याचे व 390 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण चार लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तसेच अज्ञात चोरट्याने कापरे गार्डन येथील चार फ्लॅटचे कडीकोंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचेही निष्पन्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्याचप्रमाणे सदर भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून, चोट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम निकम पुढील तपास करत आहेत.
More Stories
राज्यात काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर तर काही ठिकाणी १ नोव्हेंबर रोजी साजरे करता येणार लक्ष्मीपूजन
निवडणूक निरीक्षक उमेश कुमार यांनी घेतला हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या कामकाजाचा आढावा
दिव्यांग मतदारांना उर्त्स्फूतपणे मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन