June 14, 2024

पुणे: वीजेच्या धक्क्याने दोन बालकांचा मृत्यू; बांधकाम ठेकेदारावर गुन्हा

पुणे, १०/०९/२०२३: वीजेच्या धक्क्याने दोन बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी बांधकाम ठेकेदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुंढवा भागात ही दुर्घटना घडली होती.

मुंढवा भागात एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. बांधकाम मजूर आणि त्याचे कुटुंबीय तेथे राहत होते. ३० जून रोजी पत्र्याच्या खोलीत वीजेच्या धक्क्याने शौर्य गणेश पोटफोडे (वय ८) आणि कान्हा गणेश पोटफोडे (वय ६) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. तपासात बांधकाम ठेकेदार धारु गणेश काळे (रा. नऱ्हे आंबेगाव) याने बेकायदा वीजजोड घेतल्याचे उघडकीस आले. वीजप्रवाह पत्र्याच्या खोलीत उतरल्याने शौर्य आणि गणेश यांचा मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर ठेकेदार धारु काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.