पुणे, ०६/०७/२०२३: पतीपासून वेगळे राहत असलेल्या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्या मुलाला सांभाळण्याचे आश्वासन देऊन बलात्कार करणार्या गुन्हे शाखेतील एका पोलिसावर बलात्कार तर तिला शिवीगाळ करणार्या त्याच्या सहकारी पोलिस साथीदाराचे प्राथमिक चौकशीअंती निलंबन करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी हे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी कादिर कलंदर शेख, समीर पटेल अशी निलंबीत करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत एका महिलेनी लष्कर ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणात बलात्कार, अॅट्रासिटी, जबरी चोरीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीपासून ती वेगळी राहत होती. तिला एक मुलगा देखील आहे. पीडित महिलेशी आरोपी कादिर शेख याची तीन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. शेखने तिला विवाहाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ केली. तरुणीला लष्कर भागातील एका हॉटेलजवळ बोलावून आरोपी कादिर शेख, समीर पटेल, दोन साथीदार आणि बुरखा परिधान केलेल्या महिलेने मारहाण केली तसेच मोबाईल हिसकावून नेला, असे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरानंतर आता पोलिस उपायुक्तांनी शेख आणि पटेल या दोन पोलिस कर्मचार्यांना निलंबीत केले आहे. सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख तपास करीत असून कादिर शेखला 7 तारखेपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.