पुणे, १ जुलै २०२५ः आगम मंदिर येथे स्थापत्य विषयक केल्या जाणाऱ्या कामामुळे गुरुवारी (ता. ३) आंबेगाव, संतोषनगर आदी भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. ४) उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
पुढील भागातील पाणी पुरवठा बंद असेल ः दत्तनगर, टेक्लो कॉलनी, आमराई, आंबेगाव बुद्रूक पर्यंतचा भाग, दळवी नगर, वाघजाई नगर, आचल फार्म परिसर, पंचम नगर, वडार वस्ती व परिसर, संतोष नगर, अंजली नगर, महावीर कुंज, वंडर सिटी, सेक्शन सोसायटी परिसर, गुरुद्वारा परिसर, आंबेगाव खुर्द गावठाण, जांभूळवाडी रस्ता आदी.

More Stories
पुणे : महिला दिनापासून पुणे मेट्रोमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव जागा
दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परत
पुणे : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३५० जणांचे रक्तदान; नववे वार्षिक शिबिर उत्साहात संपन्न