पुणे, १०/०३/२०२३: जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी व जेरिएट्रीक वेलनेस फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुण्यातील वेगळी वाट निवडून यशस्विता सिद्ध केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, लोकमान्य हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. मिताली वैद्य, उपाध्यक्ष कॅप्टन हेमंत कुलकर्णी, स्त्रीरोग विभाग संचालक डॉ. मिता नाखरे, वैद्यकीय संचालक डॉ. श्रीकृष्ण जोशी, लोकमान्यच्या प्रेरणास्थान सौ. रत्नमाला वैद्य उपस्थित होत्या.
सौ. रत्नमाला वैद्य यांनी कुंडीतल्या रोपट्याला पाणी घालून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. जीवनात विविध प्रकारे कौटुंबिक संकटे आली असताना ती संघर्षाने परतवून लाऊन आपल्या स्वराइतक्याच चिरतरुण असलेल्या आशाताईंचा आदर्श महिलांनी जगताना घ्यावा. त्यांची आजपर्यंत 29 वेळा मुलाखात घेतली पण प्रत्येकवेळी नवीन चैतन्य अनुभवता आल्याचे सुधीर गाडगीळ यांनी सांगितले. केवळ, माझ्या पत्नीने दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी बोलण्याचा व्यवसाय करु शकलो हे जाहीरपणे कबूल करतो असेही ते म्हणाले.
डॉ. अनघा जोशी (प्राचार्या, इंदिरा कॉलेज), डॉ. गौरी दामले (मधुमेह तज्ज्ञ) डॉ. सुमेधा भोसले (स्टेटस् क्लब संचालिका), मेघना काटदरे (अथश्री, ओल्ड एज होम संचालिका), गौरी पाठारे (शास्त्रीय गायिका), केतकी काळे (नृत्य), मीना जगताप (उपायुक्त, सीआयडी), अश्विनी सातव व अश्विनी जाधव (पत्रकार) यांना सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते सन्मानित केले. या सन्मानप्राप्त महिलांना आपल्या मिष्किल प्रश्नांनी गाडगीळांनी बोलतं करुन मैफिल रंगवली.
उपस्थितांच्या प्रशांना दिलखुलास उत्तर देत संवादात रंगत वाढवली. स्वप्नाली सोमवंशी यांनी प्रार्थना म्हटली. सोनिया गोगटे व रचना महाजन या दिव्यांग मुलींनी गणेशवंदनेवर नृत्य केले. डॉ. मिताली वैद्य यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. मिता नाखरे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले.
More Stories
भाषिक कौशल्यातून रोजगाराच्या अनेक संधी: प्रो. पराग काळकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हिंदी दिवस सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम संपन्न
केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांबाबतच्या नवीन कायद्याची माहिती घेऊन विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील