September 14, 2024

पुणे: पैशासाठी पत्नीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले, पतीसह दोन मित्रांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे, ०४/०४/२०२३: पैशाची गरज भागवण्यासाठी स्वतःच्या पत्नीस मारहाण करून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्या प्रकरणी एका पतीसह त्याच्या दोन मित्रांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २५ वर्षीय विवाहित महिलेने पोलिसांकडे पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे अशी माहिती मंगळवारी देण्यात आली आहे.

महिलेच्या ३१ वर्षीय पतीसह त्याचे मित्र आदित्य गौतम (रा.कसबा पेठ, पुणे) आणि सुजित पुजारी (रा.आंबेगाव ,पुणे )यांच्यावर याप्रकरणी बलात्कार, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम ४-५आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडित महिला आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. पतीने पैशाची गरज भागवण्यासाठी पिडीतेला मारहाण करून उंड्री ,हांडेवाडी रस्त्यावर उभे करून वेश्याव्यवसाय करण्यास मागील दोन वर्षापासून जबरदस्तीने भाग पाडले. त्याचे मित्र आदित्य गौतम आणि सुजित पुजारी यांच्याकडून त्याने प्रत्येकी तीन हजार रुपये घेऊन महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध करण्यास भाग पाडले. संबंधित आरोपींनी महिलेशी अनैसर्गिक संबंध ठेवून महिलेची नंतर गाडी आडवून तिला जातीवाचक शिवीगाळ करून तिच्यावर राजनौतिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात सुरुवातीला फिर्याद दाखल केली होता. संबंधित गुन्हा हा हडपसर पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई पुढील तपास करत आहेत.