पुणे, दि. १०/०५/२०२३: माहेरुन पैसे आणण्यासाठी पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ करीत तिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या पतीला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ८ मे रोजी वडगाव शेरीतील पुजा रेसीडेन्सीमध्ये घडली.
अमित अरुण मिश्रा (वय ३१ रा. वडगाव शेरी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अनुराधा अमित मिश्रा (वय २९) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. रमेश शुक्ला (वय ५४) यांनी फिर्याद दिली आहे.
अमित आणि अनुराधा यांचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर सासरी नांदत असताना अमित हा पत्नीला छळ करीत होता. माहेरहुन रक्कम आणण्यासाठी तगादा लावला होता. सततच्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून अनुराधाने राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करीत आहेत.
More Stories
पुणे: शहराच्या प्रवेशद्वारावर व्हीआयपी स्वच्छतागृह
.. तर पुण्याचे महापौरपद आऱपीआयला मिळावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी
एम्प्रेस गार्डन मध्ये पुष्प प्रदर्शन आजपासून नागरिकांसाठी खुले