पुणे, ०६/०३/२०२३: भावकीच्या वादातून वेल्ह्यात तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. होळी पौर्णिमेच्या दिवशी गोळीबार झाल्याने वेल्हे तालुक्यात घबराट उडाली.
नवनाथ रेणुसे (वय ४० रा. वेल्हे, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी माऊली उर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे याच्यासह चार साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ आणि आरोपी माऊली नातेवाईक आहेत. त्यांच्यात वाद होता. नवनाथ सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास थांबला होता. त्या वेळी आरोपी माऊली आणि साथीदारांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. आरोपी तेथून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच वेल्हा पोलीस ठाण्यातील पाेलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या नवनाथला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत आरोपी माऊली आणि साथीदारांनी नवनाथवर भावकीच्या वादातून गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन