पुणे, दि. ३० मे, २०२४ : प्रसिद्ध तबलावादक पं मंगेश मुळ्ये यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. मूळचे गोव्याचे असलेल्या पं मंगेश मुळ्ये यांचे शालेय शिक्षण मुंबई – शिवडी येथे झाले. त्यांनी प्रसिद्ध तबला नवाज महंमद अहमद खाँ साहेब यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेतले. भारतातील अनेक नामावंत गायकांसोबत आणि विशेष करून आपले मामा पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या सोबत अनेक वर्ष पं मंगेश मुळ्ये यांनी तबलासाथ केली.
याबरोबरच त्यांनी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर, पंडित प्रभाकर कारेकर, पं राजा काळे व पंडित शौनक अभिषेकी यांसारख्या प्रतिभावंत प्रख्यात कलाकारांनाही तबल्यावर साथसंगत केली.
पं मंगेश मुळ्ये यांच्या पश्चात पत्नी मानसी मुळ्ये, मुलगी, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही