March 5, 2026

पुना क्लब बिलियर्ड्स व स्नूकर लीग स्पर्धेत रिओज सोलर एनर्जी, आरएस कॅनन्स, संघवी शूटर्स संघांची विजयी कामगिरी

पुणे, 9 फेब्रुवारी 2026: पुना क्लब लिमिटेड यांच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पुना क्लब बिलियर्ड्स व स्नूकर लीग स्पर्धा 2026(पीसीबीएसएल) स्पर्धेत रिओज सोलर एनर्जी, आरएस कॅनन्स, संघवी शूटर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

पुना क्लब बिलियर्ड्स हॉलमध्ये मुख्य प्रायोजक मनिषा कन्स्ट्रक्शनचे राजन खिंवसरा व अभिषेक खिंवसरा आणिसहप्रायोजक सुनील हांडा, मुकेश संघवी, संजय संघवी यांच्या पाठिंब्यामुळे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत मिनू कारकरिया, नीरज अरोरा, साहिल हांडा, कपिल सामंत, शाहबेहराम रब्बानी, सुरज राठी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर रिओज सोलर एनर्जी संघाने बॉल ब्रेकर्स संघाचा 4-1 असा सहज पराभव केला.

दुसऱ्या सामन्यात आरएस कॅनन्स संघाने नील आणि ओबेरॉय किंग्स संघावर 3-2 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. विजयी संघाकडून कैवल्य खानापुरे, पंकज परमार, क्रिश रघानी, कपिल पंजाबी, रिकी राजपाल, अनिल काकडे यांनी अफलातून कामगिरी केली. अन्य लढतीत संघवी शूटर्स संघाने मनीषा रॉयल्सवर 3-2 असा विजय मिळवला. संघवी शूटर्सकडून गिरीश दामले, शाम राठी, सुनील आशेर यांनी सुरेख खेळी केली.

निकाल: साखळी फेरी:
रिओज सोलर एनर्जी वि.वि.बॉल ब्रेकर्स 4-1(15 रेड स्नूकर एकेरी: मिनू कारकरिया वि.वि.विनोद मखिजा 95-61; बिलियर्ड्स: साहिल हांडा पराभुत वि.धीरज कोचर 174-200;रुलेट: मिनू कारकारिया/नीरज अरोरा/साहिल हांडा/कपिल सामंत/शाहबेहराम रब्बानी वि.वि.विनोद माखिजा/धीरज कोचर/राजीव राऊत/जयदीप पटवर्धन/जमशेद गार्डा 2-0;9 रेड स्नूकर दुहेरी: नीरज अरोरा/कपिल सामंत वि.वि.जमशेद गार्डा/राजीव राऊत 70-39; 6 रेड स्नूकर एकेरी: सुरज राठी वि.वि.जयदीप पटवर्धन 59-27, 38-29);

आरएस कॅनन्स वि.वि.नील आणि ओबेरॉय किंग्स 3-2(15 रेड स्नूकर एकेरी: कपिल पंजाबी पराभुत वि.अनिश केरिंग 40-70; बिलियर्ड्स: कैवल्य खानापुरे वि.वि.प्रणय माळगावकर 201-160; रूलेट: पंकज परमार/क्रिश रघानी/कपिल पंजाबी/रिकी राजपाल/अनिल काकडे वि.वि.अनिश केरिंग/प्रणय माळगावकर/मृणाल शहा/संजय दिड्डी/अनिल रघानी 3-2; 9 रेड स्नूकर दुहेरी: अनिल काकडे/पंकज परमार वि.वि. संजय दिड्डी/मृणाल शहा 73-43; 6 रेड स्नूकर एकेरी: रिकी राजपाल पराभुत वि.अनिल रघानी 52-28, 44-47, 20-65);

संघवी शूटर्स वि.वि. मनीषा रॉयल्स 3-2(15 रेड स्नूकर एकेरी: गिरीश दामले वि.वि.कुणाल वासवानी 88-48; बिलियर्ड्स: शाम राठी वि.वि.आशिष खेरा 200-175; रुलेट: गिरीश दामले/सुनील आशेर/संजय संघवी/गिरीश खोसला/शाम राठी पराभुत वि.राजन खिंवसरा/आशीष खेरा/कुणाल वासवानी/अश्रफ परवानी/योगेश अंकलेसारिया 1-2; 9 रेड स्नूकर दुहेरी: संजय संघवी/रुसी मारोलिया पराभुत वि.योगेश अंकलेसारिया/अश्रफ परवानी 71-84; 6 रेड स्नूकर एकेरी: सुनील आशेर वि.वि.अयान खान 68-41, 57-23)