April 22, 2024

एमएसएलटीए तर्फे आयोजित रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील सब-ज्युनियर टेनिस स्पर्धेत ऋषव प्रसाद, ऋषिकेश माने, चांदोग्या पाठक यांचा मानांकीत खेळाडूंवर विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश

मुंबई, 16 फेब्रुवारी 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित 13व्या रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात ऋषव प्रसाद, ऋषिकेश माने व चांदोग्या पाठक यांनी मानांकीत खेळाडूंवर विजय मिळत उपांत्य फेरीत धडक मारली.

जीए रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात उपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात पश्चिम बंगालच्या बिगर माानंकीत ऋषव प्रसादने आपल्या खेळात सातत्य राखत राजस्थानच्या अव्वल मानांकीत विवान मिर्धाचा 6-2,7-6(5) असा तर महाराष्ट्राच्या सातव्या मानांकीत ऋषिकेश माने याने दिल्लीच्या दुस-या मानांकीत विराज चौधरीचा 6-3, 6-3 असा एकतर्फी लढतीत पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. आसामच्या आठव्या मानांकीत चांदोग्या पाठकने उत्तर प्रदेशच्या चौथ्या मानांकीत युवान गर्गचा 6-3, 6-3 असा तर महाराष्ट्राच्या तिस-या मानांकीत स्मित उंद्रेने हरयाणाच्या सहाव्या मानांकीत आरव जाखरचा 6-3, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या गटात कर्नाटकच्या अव्वल मानांकीत कार्तिक पद्मकुमारने दिल्लीच्या अक्षिता अंतिलचा 6-2, 6-0 असा तर दुस-या मानांकीत सृष्टी किरणने हरयाणाच्या आठव्या मानांकीत सरेना गहलोतचा 6-1, 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तमिळनाडूच्या तिस-या मानांकीत श्रव्या सौंदर्या नुम्बुरीने आपल्या राज्य सहकारी पाचव्या मानांकीत वसुंद्रा बालाजीचा 6-2, 6-2 तर तेलंगणाच्या चौथ्या मानांकीत निशा एन्जाने गुजरातच्या सातव्या मानांकीत जेन्सी कनाबारचा 6-0, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत मुलांच्या गटात दिल्लीच्या विराज चौधरी व हरयाणाच्या आरव जाखर या अव्वल मानांकीत जोडीने महाराष्ट्राच्या स्मित उंद्रे व नमिश हुड यांचा 6-3, 6-3 असा तर राजस्थानच्या विवान मिर्धा व उत्तर प्रदेशच्या अनय पांडे या दुस-या मानांकीत जोडीने उत्तर प्रदेशच्या युवान गर्ग व महाराष्ट्राच्या ऋषिकेश माने या तिस-या मानांकीत जोडीचा 6-3, 6-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात कर्नाटकच्या कार्तिक पद्मकुमार व तमिळनाडूच्या श्रव्या सौंदर्या नुम्बुरी या अव्वल मानांकीत जोडीने महाराष्ट्राच्या सृष्टी सूर्यवंशी व तमिळनाडूच्या वसुंद्रा बालाजी या चौथ्या मानांकीत जोडीचा 6-2, 6-3 असा तर तेलंगणाच्या निशा एन्जा व कर्नाटकच्या सृष्टी किरण या दुस-या मानांकीत जोडीने हरयाणाच्या सरेना गहलोत व आशी कश्यप या तिस-या मानांकीत जोडीचा 6-2, 6-7(2) असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट- उपांत्यपुर्व फेरी- मुले
ऋषव प्रसाद (पश्चिम बंगाल) वि.वि विवान मिर्धा ( राजस्थान)(1)6-2,7-6(5)
स्मित उंद्रे( महाराष्ट्र ) (3) वि.वि आरव जाखर(हरयाणा)(6) 6-3, 6-4
चांदोग्या पाठक(आसाम)(8) वि.वि युवान गर्ग (उत्तर प्रदेश)(4) 6-3, 6-3
ऋषिकेश माने ( महाराष्ट्र )(7) वि.वि विराज चौधरी (दिल्ली) (2) 6-3, 6-3
मुली-
कार्तिक पद्मकुमार (कर्नाटक) (1) वि.वि अक्षिता अंतिल(दिल्ली) 6-2, 6-0
श्रव्या सौंदर्या नुम्बुरी ( तमिळनाडू)(3)वि.वि वसुंद्रा बालाजी (तमिळनाडू)(5) 6-2, 6-2
निशा एन्जा ( तेलंगणा)(4) वि.वि जेन्सी कनाबार(गुजरात) (7) 6-0, 6-3
सृष्टी किरण (कर्नाटक) (2) वि.वि सरेना गहलोत(हरयाणा)(8) 6-1, 6-2

दुहेरी गट- उपांत्य फेरी- मुले
विराज चौधरी (दिल्ली)/ आरव जाखर(हरयाणा)(1) वि.वि स्मित उंद्रे( महाराष्ट्र )/नमिश हुड(महाराष्ट्र)6-3, 6-3
विवान मिर्धा ( राजस्थान)/ अनय पांडे( उत्तर प्रदेश)(2) वि.वि युवान गर्ग (उत्तर प्रदेश)/ ऋषिकेश माने ( महाराष्ट्र )(3) 6-3, 6-0,

मुली-
कार्तिक पद्मकुमार (कर्नाटक)/श्रव्या सौंदर्या नुम्बुरी ( तमिळनाडू)(1) वि.वि सृष्टी सूर्यवंशी (महाराष्ट्र )/ वसुंद्रा बालाजी (तमिळनाडू)(4) 6-2, 6-3
निशा एन्जा ( तेलंगणा)/सृष्टी किरण (कर्नाटक)(2) वि.वि सरेना गहलोत(हरयाणा)/आशी कश्यप(हरियाणा)(3) 6-2, 6-7(2)