पुणे,दि.27 नोव्हेंबर 2025: ऐम टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज (16 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत पुण्याच्या रिशीता यादव हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली.
नवसह्याद्री क्रीडा संकूल टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात सातव्या मानांकित मध्यप्रदेशच्या मयंक राजन याने कर्नाटकच्या रुणमन महेशचा 7-6(2), 4-6, 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या रोहन बजाज याने आपला शहर सहकारी स्मित उंद्रेचा 3-6, 6-4, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
मुलींच्या गटात रिशीता यादव याने नवल शेखवर 6-0, 6-1 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत स्वरा जावळेने जान्हवी सावंतचा 2-6, 6-4, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुहेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या आर्यन कीर्तनेने तामिळनाडूच्या गौतम व्यंकटेश बी यांनी अमोघ पाटील व नीरज जोर्वेकर यांचा 6-3, 7-5 असा पराभव केला. मुलींच्या गटात रिशिता यादव व जान्हवी सावंत या जोडीने अव्वल मानांकित कर्नाटकच्या धन्वी बोपण्णा व महाराष्ट्राच्या रितू ग्यानचा 6-1, 2-6, 10-5 असा तर, प्रिशा पाटील व अनिका नायर यांनी वाण्या अग्रवाल व अन्वी चिटणीस यांचा 6-4, 6-0 असा पराभव केला.
निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी: मुले:
मयंक राजन(7)(मध्यप्रदेश)वि.वि.रुणमन महेश(कर्नाटक)7-6(2), 4-6, 6-2;
रोहन बजाज (महाराष्ट्र)वि.वि. स्मित उंद्रे(महाराष्ट्र)3-6, 6-4, 6-4;
मुली:
रिशीता यादव (महाराष्ट्र)वि.वि. नवल शेख(महाराष्ट्र)6-0, 6-1;
स्वरा जावळे(महाराष्ट्र)वि.वि. जान्हवी सावंत (महाराष्ट्र) 2-6, 6-4, 6-3;
दुहेरी: उपांत्य फेरी: मुले:
गौतम व्यंकटेश बी(तामिळनाडू)/आर्यन कीर्तने(महाराष्ट्र)(1) वि.वि.अमोघ पाटील/नीरज जोर्वेकर(महाराष्ट्र)6-3, 7-5;
मयंक राजन (मध्यप्रदेश)/आदित्य योगी (महाराष्ट्र) वि.वि. सौमित्र किर्दत(महाराष्ट्र)/सोहम रणसुभे(महाराष्ट्र);
मुली:
रिशिता यादव/जान्हवी सावंत(महाराष्ट्र) वि.वि.धन्वी बोपण्णा(1)(कर्नाटक)/रितू ग्यान(महाराष्ट्र)6-1, 2-6, 10-5;
प्रिशा पाटील/अनिका नायर(महाराष्ट्र) वि.वि. वाण्या अग्रवाल/अन्वी चिटणीस(महाराष्ट्र)6-4, 6-0.

More Stories
डकारचे आव्हान संजय दुसऱ्यांदा पेलणार, नववर्षातील रॅलीसाठी सज्ज
योनेक्स सनराईज डेक्कन जिमखाना आणि एसबीए कप डिस्ट्रिक्ट सुपर 100 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातून 515 खेळाडू सहभागी
महाराष्ट्र क्रिकेट संघटना पुरुष कॉर्पोरेट चषक स्पर्धा २०२५–२६ ः पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय