June 16, 2024

ऋतुजा भोसले, नंदन बाळ, नितीन कन्नमवार, मानस धामणे, वैष्णवी आडकर यांना एमएसएलटीए पुरस्कार प्रदान

मुंबई, 23 मे, 2024: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) च्या वार्षिक दिनाच्या निमित्ताने आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीतील विजेती ऋतुजा भोसले, माजी प्रशिक्षक व भारतीय डेव्हिस कप संघाचे माजी कर्णधार नंदन बाळ, आंतरराष्ट्रीय टेनिस ऑफिशियल नितीन कन्नमवार, उभारता महाराष्ट्राचा टेनिसपटू मानस धामणे व वैष्णवी आडकर यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मुंबई येथे आयोजित एमएसएलटीए च्या वार्षिक दिन सोहळ्यात 35 हुन अधिक खेळाडू, 11 प्रशिक्षक आणि 2 टेनिस ऑफिशियल यांना 17.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या शिष्यवृत्ती आणि बक्षिसे देऊन सन्मानित केले.

या पुरस्काराचे वितरण इस्त्राईलचे कौंसिल जनरल कोबी शोशानी, राज्य सरकारच्या वित्तीय व क्रीडा विभागाचे सचिव ओपी गुप्ता, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, एमएसएलटीएचे उपाध्यक्ष राजीव देशपांडे, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, सहसचिव राजीव देसाई आणि शितल भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

समालोचक अतुल प्रेमनारायण, भारतीय डेव्हिस कप संघाचे माजी कर्णधार नंदन बाळ, आंतरराष्ट्रीय टेनिस ऑफिशियल नितीन कन्नमवार यांनी राज्यात टेनिसच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना एमएसएलटीएचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. तर, सर्वोत्कृष्ट जिल्हा टेनिस संघटनेचा पुरस्कार सोलापूर जिल्हा टेनिस संघटनेला प्रदान करण्यात आला.

याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीतील सुवर्णपदक विजेती ऋतुजा भोसले, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू अर्जुन कढे, मानस धामणे, वैष्णवी आडकर, अथर्व शर्मा आणि समर्थ संहिता, राष्ट्रीय विजेता अर्णव पापरकर, प्रिशा शिंदे, ऐश्वर्या जाधव यांना देखील त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

2023मध्ये राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या आरव छल्लानी(नवी मुंबई), सोनल पाटील(कोल्हापूर), पार्थसारथी मुंढे(सोलापूर)यांचा देखील सत्कार करण्यात आला.

तसेच, 2023मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या ऋतुजा भोसले हिला 2लाख रुपये व विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 16 व 18 वर्षांखालील वयोगटात सुरेख कामगिरी करणाऱ्या कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवला राज्यातील सर्वोत्कृष्ट कुमार खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

2023मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या ऋतुजा भोसलेचे प्रशिक्षक केदार शहा यांना देखील पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. केदार शहाने गोवा येथील 37व्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती. याच स्पर्धेत पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून कामगिरी बजावलेल्या अन्वित बेंद्रेचादेखील सम्मान करण्यात आला. राष्ट्रीय विजेते खेळाडू घडविणाऱ्या राज्यातील प्रशिक्षक हेमंत बेंद्रे(पुणे), संदीप किर्तने(पुणे), प्रसनजीत पॉल(पुणे), मनल देसाई(कोल्हापूर), रवींद्र पांडे(पुणे), गिरीश मिश्रा(मुंबई), गितेश अवस्थी(नवी मुंबई) यांचा देखील पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.

37व्या राष्ट्रकुल स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलेल्या महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणून उत्तम कामगिरी केलेल्या हिमांशु गोसावी यांचा देखील सम्मान करण्यात आला. 2023मध्ये सर्वोत्तम टेनिस ऑफिशियल म्हणून रिया चाफेकरचा गौरव करण्यात आला. याशिवाय 10, 12 व 14 वर्षाखालील गटातील एमएसएलटीए मास्टर्स स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक प्रदान करण्यात आला.

शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:
ऋतुजा भोसले, अर्जुन कढे, अथर्व शर्मा, वैष्णवी आडकर, मानस धामने, ऐश्वर्या जाधव, अर्णव पापरकर, आक्रुती सोनकुसरे, समर्थ संहिता, स्मित उंद्रे, पार्थसारथी मुंडे , काहिर वारिक , नैनिका नरेंद्र रेड्डी , रुमा गायकैवारी , सेजल भुतडा , आस्मी आडकर , तनिष्क जाधव, सम्प्रित शर्मा , शिवतेज शिरफुले , आराध्य म्हसदे , क्रिशांक जोशी , ऋषिकेश माने , यशवंतराजे पवार, श्लोक आळंद, दिया अगरवाल, सृष्टी सूर्यवंशी, तमन्ना नायर, श्रावी देवरे, मायरा शेख, शौर्य पाटील, त्रिशा भोसले