March 5, 2026

व्यावसायिक गोल्फ टूरसाठी पुना क्लबच्या रोहन ढोले पाटील, प्रणव मर्डीकर यांची निवड

पुणे, 25 फेब्रुवारी 2026: प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 72 द लीग या स्पर्धेच्या पहिल्या वहिल्या मोसमासाठी पुना क्लबच्या रोहन ढोले पाटील, प्रणव मर्डीकर या दोन व्यावसायिक खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

येत्या 24 फेब्रुवारी ते 6 मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण युरो स्पोर्टस वाहिनीवरून करण्यात येणार असून फॅन कोड या संकेतस्थळावरून थेट स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी रोहन ढोले पाटील यांची नवा रायपूर संघगकरीता 10लाख रुपये किंमत मोजून निवड करण्यात आली आहे., तर प्रणव मर्डीकर यांना युपी प्रो मेटियन्स संघाने 7लाख रुपयांना विकत घेतले आहे.

72 द लीग ही भारतातील पहिली फ्रँचायझी चालवलेली व्यावसायिक गोल्फ स्पर्धा असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सहा संघांमध्ये नवा रायपूर, चारमिनार चॅम्पियन(हैद्राबाद), कोलकाता क्लासिक, युपी प्रो मेटियन्स, मुंबई एसेस, राजस्थान रिगल्स यांचा समावेश आहे. प्रत्येक संघाला खेळाडूंची खरेदी करण्याकरिता 1कोटी रुपये रकेमची मर्यादा देण्यात देण्यात आली.

या लीगचे नेतृत्व लीग कमिशनर अमृत माथुर आणि पीजीटीआयचे अध्यक्ष कपिल देव हे करीत असून जय शहा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. बीसीसीआयचे सचिव असलेल्या जय शहा यांनी स्पर्धेला असलेल्या बीसीसीआयच्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रीडा क्षेत्रात असलेल्या परस्पर सामंजस्य व सहकार्याचा प्रत्यय दिला आहे.