October 16, 2025

साधु वासवानी पुल पाडण्यासाठी झोपडयांचा अडसर दुर

पुणे, १२ फेब्रुवारी २०२५ : कोरेगाव पार्क कडील बाजूस असलेल्या साधू वासवानी उड्डाणपूलाच्या कडील बाजूस पुला खाली झोपडया आहेत. त्यामुळे या पुलाचे पाडकाम करण्यास अडथळे येत होते. अखेर या झोपडयाचे पुर्नवसन ढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालया मार्फत हडपसर सर्वे नंबर १३२ येथे करण्यात आले. त्यामुळे या कामातील झोपडयांचा अडसर दुर झाला आहे. जुना पूल पाडण्याची उर्वरित काम सुरू करण्यात आले आहे. आगामी नऊ महिन्यांमध्ये या पुलाचे काम पुर्ण करण्याचे नियोजन आहे.

पुणे स्टेशन जवळ, कोरेगाव पार्क भागात हा साधु वासवानी रेल्वे उड्डाणपुल आहे. हा पूल बांधून ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या पार्श्वभुमीवर महापालिकेने तो पाडून नवीन रेल्वे उड्डाण पुल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाच्या कामासाठी सुमारे ८३ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.त्यानुसार या पुलाचा काही भाग पुणे महापालिकेने आगोदरच पाडला आहे. हा पुल हा रेल्वे मार्गावर उभारण्यात येणार आहे. याचा आराखडा तयार करुन रेल्वे विभागाला पाठविण्यात आला होता. आता असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली मध्यभागी खांब आहे. नवीन पुल उभारताना असा खांब पुन्हा उभारू नये, असे रेल्वे विभागाचे म्हणणे होते.बो स्ट्रिंग गर्डर या पध्दतीने पुल उभारण्यात यावे असे सांगण्यात आले होते. त्यात पु्न्हा बदल करण्यात येवून ओपन वेब गर्डर या पद्धतीने पुल उभारण्याचे ठरविण्यात आले. या पुलाची लांबी ५४ मीटर असुन, त्याची बांधणी रेल्वे प्रशासनाच्या सुचनेनुसार केली आहे. साधू वासवानी उड्डाणपूलाच्या काही भाग पुणे महापालिकेने पाडला आहे. या पुला लगत झोपड्या आहेत. या झोपडयाचे पुर्नवसन ढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालया मार्फत हडपसर सर्वे नंबर १३२ येथे करण्यात आले. त्यामुळे या कामातील झोपडयांचा अडसर दुर झाला आहे. जुना पूल पाडण्याची उर्वरित काम सुरू करण्यात आले आहे. आगामी नऊ महिन्यांमध्ये या पुलाचे काम पुर्ण करण्याचे नियोजन आहे, असे प्रकल्प विभागाचे मु्ख्य अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.

You may have missed