December 14, 2024

श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या सम्मेद शेटे याला विजेतेपद

पुणे, 19 फेब्रुवारी 2023: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत नवव्या फेरीअखेर कोल्हापूरच्या सम्मेद शेटे याने 8.5गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
अश्वमेध हॉल, कर्वेरोड, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत कोल्हापूरच्या सम्मेद शेटे याने रॉय लोपेझ पद्धतीने आपल्या डावास प्रारंभ केला. त्याने अमेय औदीला 35 चालींमध्ये बरोबरीत रोखले व 8.5 गुण पटकावत विजेतेपद पटकावले. फिडे मास्टर ऋत्विज परब याने 8गुणांसह दुसरा, तर आयएम विक्रमादित्य कुलकर्णी याने तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या सम्मेद शेटे याला 50000रुपये, उपविजेत्या ऋत्विज परब याला 25000रुपये, तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला 15000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुजनील केमो इंडस्ट्रीचे संचालक व लक्ष्य स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक सदस्य आशिष देसाई, एमएसएलटीएचे मानद सचिव व लक्ष्य स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक सदस्य सुंदर अय्यर, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, पुणे रेडिओलॉजी असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिरीष गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, चीफ आरबिटर विनीता श्रोत्री आदी मान्यवर उपस्थित होते. दिप्ती शिदोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: नववी फेरी: व्हाईट व ब्लॅक या नुसार:
सम्मेद शेटे(8.5pts) बरोबरी वि.अमेय औदी(7.5गुण);
ऋत्विज परब(8गुण)वि.वि.निखिल दीक्षित (7गुण);
विक्रमादित्य कुलकर्णी(8गुण)वि.वि.आकाश दळवी(7गुण);
केवल निर्गुण(6.5गुण) पराभुत वि.कृष्णातर कुशागर(7.5गुण);
पुष्कर डेरे (7.5गुण) वि.वि.नमीत चव्हाण(6.5 गुण);
मोहम्मद शेख(6.5 गुण) बरोबरी वि.प्रियांशू पाटील (6.5गुण);
वीरेश शरणार्थी(6 गुण) पराभुत वि.अभिषेक केळकर(7गुण);
सुयोग वाघ (7गुण)वि.वि.आहान शर्मा(6गुण);
शंतनू भांबुरे(7गुण)वि.वि.श्रावणी उंडाळे (6गुण);
विहान दावडा(6.5गुण) बरोबरी वि.कुश भगत(6.5गुण);
भुवन शितोळे (6 गुण) पराभुत वि.गौरव झगडे (7 गुण);
हर्षल पाटील (7गुण) वि.वि.अक्षय बोरगावकर (6 गुण);
इतर पारितोषिके:
रेटिंग एलो 1400-1600:
1. विहान दावडा, 2. प्रणव बुरली, 3.शरणार्थी श्लोक;
रेटिंग एलो 1200-1399:
1. हर्षल पाटील, 2. आरव अय्यर, 3. अथर्व सोनी;
रेटिंग एलो 1000-1199:
1. गौरांग भंडारी, 2. परम जालन, 3. भुवन शितोळे;
अनरेटेड:
1. ईशान अर्जुन पीवाय, 2. अथर्व जावळी, 3. ऋतिक राय;
प्रौढ:
1. लहुचंद ठाकुर, 2. ईश्वर रामटेके, 3. चंद्रकांत डोंगरे;
सर्वोत्कृष्ट महिला:
1. आदिती कयाळ, 2. श्रावणी उंडाळे, 3. निहिरा कौल.