October 14, 2025

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा दिल्लीतही, सुप्रिया सुळेंचा दावा

पुणे:- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकरी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा बारामती खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की मला एक गोष्ट आश्चर्याची वाटते की जे अटक होत आहे ते पुण्यातूनच का अटक होत आहे आणि हे तुमच्या चॅनेलवर दाखवण्यात आलं आहे. यामुळे याबाबत पोलिसांनी पडताळणी करायला हवी की नक्की काय चाललं आहे.ही फक्त राज्याची बातमी नाहीतर याची चर्चा आत्ता दिल्लीतही होत आहे.दिल्लीतील अनेक खासदार तसेच विचारवंत यांचे फोन येत आहे.नक्की महाराष्ट्रात काय चाललं आहे याबाबत देशात अस्वस्थता आहे.यामुळे राज्य सरकारने याबाबत पारदर्शक माहिती दिली पाहिजे, असे यावेळी सुळे म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांना पालकमंत्री पदाच्या बाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की निवडून आल्यानंतर सरकार बसलं असून सरकारची जबाबदारी आहे पण पालकमंत्र्यांबाबत पहिल्यांदाच मी ऐकत आहे. अनेक वेळा सत्ता येते पण पालकमंत्री अशी चर्चा ही राज्याच्या हिताचे नाही.राजकारण बाहेर जाऊन असेल पाहिजे. सरकारला एवढं मोठं बहुमत मिळालं आहे तरीही सगळ्याच गोष्टीत उशिरा होत आहे.अनेक मंत्र्याने चार्ज घेतला नाही,पण मी ही पालकमंत्री बद्दल की अशी चर्चा कुठे ऐकली नाही अस यावेळी सुळे म्हणाल्या.

लाडकी बहीण योजनेचं निकष बदलण्यात येणार आहे याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या कीमी अगोदर बोलली होती काल ही बोलली आहे हे अपेक्षित होत.हे मी सातत्याने बोलत होते.आत्ता सरकार आल असून मला आरोप करायचं नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत.ते महत्वाच्या पदावर बसले आहेत. राज्याचा पिक्सल डिपॉझिट रिपोर्ट पहा,कधी तरी पॉलिसी वर बोलल पाहिजे. डीपीडीसी चे पैसे वळवले जात आहेत. महिलांची फसवणून होत आहे.अस यावेळी सुळे म्हणाल्या.

बीड घटनेबाबत सुळे म्हणाल्या की बीड आणि परभणी राजकारण बाजूला ठेवून पारदर्शक कारभार करावा एवढे अपेक्षा या सरकार कडून आहे.संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी बीड प्रकरणांमध्ये निर्णय घ्यावा तसेच जे फोटो व्हायरल होत आहे तर आमचे कराड यांच्याशी संबंध होते.आम्ही ते कधीही नाकारले नाहीत कारण पूर्वी आम्ही एकाच पक्षात होतो त्यामुळे फोटो असणार आमच्यासोबत पक्षात होते तेव्हा असणारच मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते गोविंद बाग येथे आले असताना कराड देखील आले होते आणि तेव्हाचे फोटे आहे.राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे परभणी आणि बीड प्रकरणात न्याय दिला पाहिजे संवेदनशील पणा दाखवल पाहिजे.राजकरण बाजूला ठेवून कारवाई झाली पाहिजे अस यावेळी सुळे म्हणाल्या.