पुणे, दि.२३/०२/२०२३: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख व आजीवन अध्ययन व विकास विभागाचे संचालक डॉ. विलास आढाव, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. अपर्णा राजेंद्र, उपकुलसचिव प्रदीप कोळी, अधिसभा सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
More Stories
मेट्रो स्थानके, विमानतळ तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार
संशोधक कृती समितीचे बार्टीसमोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा
क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे क्रेडाई महाराष्ट्रच्या प्रथम सर्वसाधारण सभेचा आणि स्थापना सोहळ्याचा भव्य आयोजन