June 24, 2024

60व्या राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत दहाव्या फेरीअखेर सेतुरामन एसपीचे विजेतेपदाकडे वाटचाल

पुणे, 25 ऑगस्ट 2023: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित 60व्या राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत  पीएसपीबीच्या सेतुरामन एसपी याने पहिल्या पटावर खेळताना नीलाश साहाविरुध्द निर्णायक विजयाची नोंद करून दहाव्या फेरीत आघाडीचे स्थान कायम राखले. काळ्या मोहरया सह खेळताना मिळवलेल्या या विजयामुळे सेतुरामनने विजेतेपदाकडे निश्चितपणे आगेकूच केली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत दहाव्या फेरीत दुसऱ्या पटावर ग्रँड मास्टर दिप्तयन घोष आणि आंतर राष्ट्रीय मास्टर आरोण्यक घोष यांच्यातील लढत केवळ 30मिनिटात बरोबरीत सुटली. उद्या होणाऱ्या महत्वपूर्ण अखेरच्या फेरी साठी दोघांनीही त्यामुळे विश्रांती मिळवण्याची संधी घेतली.

 
तिसऱ्या पटावर ग्रँड मास्टर विघ्नेश एनआर आणि ग्रँड मास्टर विष्णू प्रसन्ना व्ही यांच्यातील अत्यंत चुरशीची लढत अखेर बरोबरीत सुटली. डावाच्या मध्यावर विघ्नेश ला विजयाची संधी होती परंतु विष्णु प्रसन्ना याने अत्यंत कल्पकपने सर्वोत्तम बचावात्मक चाली करताना पराभव टाळण्यात यश मिळवले. 
 
अव्वल मानांकित अभिजीत गुप्ताने तुल्यबळ प्रतिस्पर्धी सायंतन दास विरुध्द काळी मोहरी घेऊन खेळताना महत्वपूर्ण विजय मिळवून दहाव्या फेरीअखेर 8 गुणांची कमाई केली. दीर्घकाळ लांबलेल्या लढतीत गुप्ताने चतुरस्त्र खेळ करताना फॉर्ममध्ये असलेल्या व स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या दासला पराभुत केले.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दहावी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार:
नीलाश साहा(7.5गुण)(आरएसपीबी) पराभुत वि.सेतुरामन एसपी(9गुण)(पीएसपीबी);
आरोण्यक घोष(8गुण)(आरएसपीबी)बरोबरी वि.दिप्तयन घोष(8गुण)(पश्चिम बंगाल);
विघ्नेश एनआर(8गुण)(आरएसपीबी) बरोबरी वि.विष्णू प्रसन्ना व्ही(8गुण)(तामिळनाडू);
सायंतन दास(7गुण)(आरएसपीबी) पराभुत वि.अभिजीत गुप्ता(8गुण)(पीएसपीबी);
अभिमन्यू पुराणिक(8गुण)(एएआय)वि.वि.आकाश जी(7गुण)(तामिळनाडू);
मित्रभा, गुहा(8गुण)(पश्चिम बंगाल)वि.वि.दीपन चक्रवर्ती जे.(7गुण)(आरएसपीबी);
श्रीहरी एलआर(7.5गुण)(तामिळनाडू)बरोबरी वि.इनियन पी(7.5गुण)(तामिळनाडू);
उत्सव, चॅटर्जी(6.5गुण)(पश्चिम बंगाल) पराभुत वि. सूर्य शेखर गांगुली (7.5गुण)(पीएसपीबी);
विशाख एनआर(7.5गुण)(आरएसपीबी)वि.वि.कोल्ला भवन(6.5गुण)(आंध्रप्रदेश);
दीप सेनगुप्ता(7गुण)(पीएसपीबी)बरोबरी वि.दिनेश शर्मा(7गुण)(एलआयसी);
सुयोग वाघ(7.5गुण)(महा)वि.वि.श्यामनिखिल पी(6.5गुण)(आरएसपीबी);
अभिषेक केळकर(6.5गुण)(महा) पराभुत वि.व्यंकटेश, एम.आर.(7.5गुण)(पीएसपीबी);
अपूर्व, कांबळे (7.5गुण)(कर्नाटक)वि.वि.अनुज श्रीवत्री(6.5गुण)(मध्यप्रदेश);
धनंजय एस(6.5गुण)(छत्तीसगढ) पराभुत.वि.कृष्णा सीआरजी(7.5गुण)(आरएसपीबी);
नितीन एस.(7.5गुण)(आरएसपीबी) वि.वि. सम्यक धारेवा(6.5गुण)(पश्चिम बंगाल);
राम, एस. कृष्णन (6.5गुण)(बीएसएनएल) पराभुत वि.उत्कल साहू (7.5गुण)(ओडिशा);
मुकुंद अग्रवाल(6गुण)(गुजरात) पराभुत वि.सिद्धांत मोहपात्रा(7गुण)(आरएसपीबी);
अर्घ्यदीप दास(7गुण)(आरएसपीबी)वि.वि.श्रीराज भोसले(6गुण)(महा).