पुणे, 20/02/2025: मी शिवरायांचा मावळा कधीही जाती धर्माच्या नावाने भेद करणार नाही, मी महिलांचा आदर करेन, कुठल्याही अंधश्रद्धांना बळी पडणार नाही अशी शिवशपथ घेत शाळेतील विद्यार्थी, विविध सोसायटी व वस्तीतील नागरिक यांनी शिवजयंती साजरी केली. तसेच संविधान जागर अभियानाअंतर्गत श्री छत्रपती प्रतिष्ठान केळेवाडी व इंदिरानगर वसाहत, औंध येथील नागरिकांनी शिवज्योत मशाल रॅली काढण्यात आली. या मशाल रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा देणाऱ्या पोवाडा सादरीकरणाने झाला. शिवरायांच्या जयंतीनिमित्त नव स्वराज्य, नवा विचार, नवा माणूस घडवणाऱ्या मानवतावादी छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन त्यांच्या मार्गावर चालण्याचा वसा भावी पिढीने घेतला पाहिजे या उद्देशाने हे उपक्रम राबवण्यात आले, असं संविधान जागर अभियानाचे समन्वयक ऋषिकेश येवलेकर यांनी सांगितले.
या अभियानांतर्गत शिवरायांच्या विचारांचं तोरण घराच्या दारावर लावण्यात आलं तसंच विहारांमध्ये, मंडळात शिवाजी महाराजांच्या कथा सांगण्यात आल्या. संविधान जागर अभियानामार्फत महाराजांच्या अष्टपैलू पराक्रमाची माहिती सांगणारी पुस्तिका मुलांना भेट देण्यात आली.

More Stories
दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परत
पुणे : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३५० जणांचे रक्तदान; नववे वार्षिक शिबिर उत्साहात संपन्न
विमाननगरातील रामेश्वरम हॉटेलवर महापालिकेचा हातोडा; ६,५०० चौ. फूट बेकायदा बांधकाम जमीनदोस्त