October 17, 2025

धक्कादायक… दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे भाजप आमदाराच्या पीएच्या पत्नीचा मृत्यू

पुणे, ०३ एप्रिल २०२५:- पुणे शहराला विद्येच माहेरघर म्हटल जात आणि याच संस्कृतिक,वैद्यकीय,तसेच विद्येच्या माहेरघर असलेल्या पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे.पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार असून रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्विह सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.सत्ताधाऱ्यांच्या राजाश्रयाशिवाय रुग्णालय प्रशासनामध्ये एवढ्या उन्मत्तपणा येणे अशक्य आहे.अस म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिलेच्या नातेवाईकांनी अडीच लाख भरल्यानंतरही पूर्ण 10 लाख रुपये देत नाही तोपर्यंत उपचार करणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं यानंतर महिलेने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला पण तिचा आत्ता मृत्यू झाला असून हा मृत्यू दीनानाथ रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे झाला असल्याचं सांगितलं जातं आहे.

याबाबत आमदार अमित गोरखे म्हणाले की काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे मोनाली सुशांत भिसे ज्याचे पती सुशांत भिसे माझ्याकडे स्वीह सहाय्यक म्हणून काम करतात त्यांची पत्नी ही प्रेग्नेंट असल्याने त्यांनी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात ऍडमिशन साठी गेल्या असताना दहा लाख भरा नाहीतर आम्ही ऍडमिट करून घेणार नाही अस सांगितल गेलं आणि त्यांच्या नातेवाईकांनी ३ लाख रु भरण्याची तयारी केली असताना देखील क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे म्हणून आम्ही ऍडमिशन देऊ शकत नाही म्हणून ऍडमिट केलं गेलं नाही.तसेच मंत्रालयातून कॉल गेलं असताना देखील त्या भगिनीला ऍडमिशन देण्यात आलं नाही.आणि मग त्यांना दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जावं लागलं आणि तिथं ट्रीटमेंट मिळाल्यानंतर त्यांना दोन जुळी मुलं देखील झाली मात्र दुर्दैवाने मोनाली भिसे यांचा मृत्यू झाला आहे. दीनानाथ रुग्णालय हे गरिबांसाठी तसेच एक ट्रस्ट म्हणून चालवल जातो मात्र त्यांची अश्या प्रकारचा गंभीर गुन्हा केला आहे याच्यावर गंभीर पावले उचलावी अशी मागणी यावेळी गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि अत्यंत संवेदनशीलपणामुळे तिला आपलं जीव गमवावा लागलं आहे.विशेष बाब म्हणजे भिसे ही भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्विह सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी आहे.त्यांना ऍडमिट करण्यासाठी मंत्रालयातून फोन आलेलं असताना देखील तिला ऍडमिट करण्यात आलेलं नाही. दीनानाथ रुग्णालयाच्या संदर्भात असंख्य तक्रारी असताना देखील रुग्णालय दिमाखात उभ असून सत्ताधाऱ्यांच्या राजाश्रयाशिवाय रुग्णालय प्रशासनामध्ये एवढ्या उन्मत्तपणा येणे अशक्य आहे.अस यावेळी अंधारे म्हणाल्या.

You may have missed