January 18, 2026

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील धक्कादायक प्रकार समोर; मुलींच्या वसतिगृहात सापडल्या दारूच्या बाटल्या!

पुणे, १८ मार्च २०२५: गेल्या वर्षभरापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे वेगवेगळ्या नकारात्मक गोष्टींसाठी चर्चेत आहे. मुलांच्या वसतिगृहात गांजा सापडणे, विद्यापीठ परिसरात अवैध रित्या तंबाखू विक्री होणे, इत्यादी अनेक घटना सातत्याने घडत आहेत. आता पुन्हा एकदा असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन होत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे सदस्य शिवा बारोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृहात वास्तव करत असलेल्या एका विद्यार्थीनीने या सर्व गैरप्रकारची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही. त्यानंतर संबंधित विद्यार्थीनी प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे. सगळ्यात महत्त्वाचे मुलींच्या वसतिगृह गेटवर बायोमेट्रिक उपकरणे आहेत. असे असताना येवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या गोष्टी आत कशा जातात. वस्तीगृह कर्मचारी या गोष्टी पुरवतात का आता देखील शोध घेतला गेला पाहिजे. पीडित व्यक्तीला न्याय देण्याऐवजी ज्या व्यक्ती विद्यार्थ्यांनी अन्याय केला त्या विद्यार्थ्यांच्या प्राध्यापकांनी मिळत व्यक्तीवर दबाव आणण्याचे काम केले.

सगळ्यात भयानक प्रकार म्हणजे फ्री अभ्यास केंद्राचा एक प्राध्यापक मुलींच्या वस्तीगृहामध्ये गेला होता. अशा पद्धतीने मुलींच्या वस्तीगृहामध्ये पुरुष प्राध्यापकांना विनापरवानगी जाता येत नाही. मंग हा प्राध्यापक मुलींच्या वस्तीग्रह मध्ये कसा आणि का गेला ? इ. ब अनेक प्रश्न समोर येत आहेत.‌ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आम्ही लेखी पत्र व्यवहार करून या सर्व प्रकारावर चौकशी समिती गठित करण्याची कुलगुरूंना विनंती करत आहोत. या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कटरात कठोर कारवाई झाली पाहिजे. ज्या महिला कर्मचाऱ्यांनी दखल न घेता केवळ टाटा करण्याचा प्रयत्न केला व पीडीएफ व्यक्तीवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. थोडक्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव बदनाम करण्याचा षडयंत्र वारंवार होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू मुलींच्या वस्तीग्रह मध्ये सापडत असेल तर हे अत्यंत धक्कादायक आहे. मग ग्रामीण भागातले आई वडील मुलींना का म्हणून पाठवतील?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मागील सहा महिन्यापासून दोन वेळेस गांजा आणि अमली पदार्थ सापडत आहेत आणि परत एकदा मुलींच्या वसतिगृहात असाच प्रकार घडून आला आहे. विद्यापीठ हे दिवसेंदिवस अमली पदार्थांचे केंद्र बनत चाललेले आहे .या सर्व विषयात वसतिगृह प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल आहे. मुख्य वसतिगृह प्रमुख, मा.कुलसचिव मा.कुलगुरू यांना लेखी पत्रव्यवहार करून सुद्धा या विषयाची दखल कोणीच घेतलेली नाही .नशा मुक्त कॅम्पस होण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने उपाय योजना कराव्यात अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.