March 5, 2026

सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत फुटबॉल लीगमध्ये सेंट व्हिन्सेंट हायस्कुल संघाला विजेतेपद

पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2026 – सेंट व्हिन्सेंट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे आयोजित सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत फुटबॉल लीगमध्ये सेंट व्हिन्सेंट हायस्कुल संघाने 26 गुण व 27गोल फरकाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत विद्या व्हॅली स्कुल संघाने 26 गुण व 24गोल फरकाच्या जोरावर दुसरा क्रमांक पटकावला. तर, लॉयला हायस्कूल संघाने 23 गुणांसह तिसरा क्रमांक पटकवला.

अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत विराज चौहान(5मि.) याने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर नॉलेज हॅबिटॅट स्कूल संघाने सेंट पॅट्रिक्स स्कूल चा 1-0 असा पराभव केला. आदित्य द्विवेदी(5,14 मि.)याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर विद्या व्हॅली स्कूल संघाने लॉयला हायस्कूलचा 2-1 असा पराभव केला. अन्विक लोबो(9मि.) याने केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर सेंट व्हिन्सेंट हायस्कूल संघाने नॉलेज हॅबिटॅट स्कूलवर 1-0 असा विजय मिळवला.

स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला करंडक, पदके अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या सुपरवायझर फिओना म्हस्के, शिक्षिका जयश्री ऍलॉईस, शौर्य डुंकूना, फिओना मेंडोसा आणि सुमा दास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. विल्सन अँड्र्यू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एल्विन लॉरेन्स यांनी उपस्थितांचे आभार मानले.

निकाल: साखळी फेरी:
नॉलेज हॅबिटॅट स्कूल: 1(विराज चौहान 5मि.) वि.वि. सेंट पॅट्रिक्स स्कूल: 0;
हिलग्रीन स्कूल: 1 (हमदान खान 3मि.) वि.वि.द कल्याणी स्कूल: 0;
क्लाइन मेमोरियल स्कूल: 0 बरोबरी वि. दस्तूर को-एड स्कूल: 0;
विद्या व्हॅली स्कूल: 1(सायस जिजीभॉय 12मि.) वि.वि.द कल्याणी स्कूल: 0;
नॉलेज हॅबिटॅट स्कूल: 0 बरोबरी वि.द कल्याणी स्कूल: 0;
विद्या व्हॅली स्कूल: 2(आदित्य द्विवेदी 5,14 मि.) वि.वि.लॉयला हायस्कूल: 1 (गगन पाटील 11मि.);
सेंट व्हिन्सेंट हायस्कूल: 1(अन्विक लोबो 9मि.) वि.वि.नॉलेज हॅबिटॅट स्कूल: 0.