March 3, 2026

केएमबीए बास्केटबॉल लीग स्पर्धेत स्टॉर्म, एसेस संघांचे विजय

पुणे, 29 जानेवारी 2026: कर्णा मेहता बास्केटबॉल अकॅडमी (केएमबीए) यांच्या वतीने आयोजित केएमबीए बास्केटबॉल लीग स्पर्धेत मुलींच्या गटात स्टॉर्म, एसेस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव केला.

एबिल कॅसल रॉयल टॉवर्स, भोसले नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात स्टॉर्म संघाने लिंक्स संघावर 31-28 अशा फरकाने विजय मिळवला. स्टॉर्म संघाकडून इरा पालरेशा(10गुण), युक्ता नायर(6गुण), काव्या भंडारी(4गुण), अनन्या कालकर(3गुण), शमिका समा(4गुण), सई बर्गे(2गुण) यांनी सुरेख कामगिरी बजावली. पराभूत संघाकडून दिव्यांका भोसले(6गुण), राधा गुप्ता(5गुण), समा माहिका(5गुण), आर्या काळबंधे(6गुण), सियोना गोयल(3गुण), अनाहिता गुप्ता(2गुण) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

दुसऱ्या सामन्यात साईशा शेंडे(15गुण), अनैशा अग्रवाल(9गुण), रिया सूद(8गुण), समायरा मेहता(4गुण), आरिका महाबळेश्वरकर(2गुण), मोही विश्नोई(1गुण) यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एसेस संघाने स्पार्क्स संघाचा 46-44 असा कडवा प्रतिकार केला.

निकाल: साखळी फेरी: मुली:
स्टॉर्म: 31 (इरा पालरेशा 10 गुण, युक्ता नायर 6गुण, काव्या भंडारी 4गुण, अनन्या कालकर 3गुण, शमिका समा 4गुण, सई बर्गे 2गुण) वि.वि. लिंक्स: 28 (दिव्यांका भोसले 6गुण, राधा गुप्ता 5गुण, समा माहिका 5गुण, आर्या काळबंधे 6गुण, सियोना गोयल 3गुण, अनाहिता गुप्ता 2गुण);

एसेस: 46(साईशा शेंडे 15गुण, अनैशा अग्रवाल 9गुण, रिया सूद 8गुण, समायरा मेहता 4गुण, आरिका महाबळेश्वरकर 2गुण, मोही विश्नोई 1गुण)वि.वि.स्पार्क्सः 44(अरिशा पिंपोडकर 15गुण, भार्गवी सोनावणे 10गुण, मिराई चौधरी 2गुण, अंजली लोणारी 6गुण, निश्चल अग्रवाल 4गुण, स्पृहा कर्वे 4गुण).