May 18, 2024

एमएनजीएलची जास्तीत जास्त कनेक्शन देण्यासाठी प्रयत्नशील -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे, 28/06/2023: छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामधील नागरिकांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा होण्यासाठी एमएनजीएलची (महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड)जास्तीत जास्त गॅस कनेक्शन उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) सांगितले.

बाणेर येथील एमएनजीएल कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामधील पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याबद्दल सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. छत्रपती शिवाजीनगर मतदार संघामध्ये आत्तापर्यंत किती नागरिकांना कनेक्शन दिली गेली? नवीन कनेक्शन देण्यासाठी काय अडचणी येत आहेत? सन २०२३ – २०२४ मध्ये नवीन कनेक्शन देण्याबाबतचा प्लॅन काय आहे? याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. खोदाई परवानगीसाठी अडचणी येत असतील तर त्या सोडविण्यासाठी पुणे महापालिका, वाहतूक पोलीस विभाग यांचेशी संपर्क साधला जाईल, असे आश्वासन आमदार शिरोळे यांनी दिले.

यावेळी एमएनजीएल चे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, रवींद्र साळेगावकर, गणेश बगाडे, संजय शर्मा, एस.के.सिंग, रितेश इंगवले आदि उपस्थित होते.