पुणे, २७ फेब्रुवारी २०२५: पुणे महापालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने आज आंबेडकर चौक ते वारजे या दरम्यान अनधिकृत व्यवसायिकांच्या विरोधात जोरदार कारवाई केली.
वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत अतिक्रमण अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाचे उपायुक्त संदिप खलाटे, सहाय्यक आयुक्त दिपक राऊत यांचे मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रणव दळवी, गणेश गिते, उपअभियंता चिंतामणी दळवी व क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक संजय जाधव, अतिक्रमण निरीक्षक भिमाजी शिंदे, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक सागर विभुते, प्रथमेश पाटील, आयुब शेख यांच्यासह पोलीस स्टाफ व एम एस एफ स्टाफ यांच्या पथकाने १ जेसीबी, १गॅस कटर, व ३ ट्रक यांच्या सहाय्याने आंबेडकर चौक ते वारजे पुल दोन्ही बाजूकडील रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकांवर तसेच फ्रंट मार्जिन मधील व्यवसायिक यांच्यावर संयुक्त कारवाई करण्यात आली. कारवाई मध्ये नागरिकांच्या विरोधाला न जुमानता लोखंडी काऊंटर, व इतर फ्रंट मार्जिन मधील ३ ट्रक साहित्य जमा करण्यात आले व १० हजार ९५३ स्केअर फूट जागा कारवाईमध्ये मोकळी करण्यात आली. भविष्यात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात आलले आहे.
More Stories
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी
पुणे: पालिकेचा दिवाळी बचत बाजार गजबजला – दोन दिवसांत १९ लाखांची विक्री
Pune: नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी पीएमआरडीएची तालुकानिहाय ९ क्षेत्रीय कार्यालये सुरु