पुणे, दि. 14 फेब्रुवारी 2025: पुण्यातील ‘सा’ व ’नी तर्फे उस्ताद झाकीर हुसैन यांचा पूर्व नियोजित असलेला ‘धरोहर’ हा कार्यक्रम शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी स्वारगेट जवळ असलेल्या गणेश कला क्रीडा येथे सायंकाळी ६:०० वाजता आयोजित करण्यात येणार असल्याचे ‘सा’ व ’नी या संस्थेचे संस्थापक, सुरेंद्र मोहिते यांनी कळविले आहे. सदर दिवशीच हा कार्यक्रम उस्ताद झाकीर हुसैन यांच्या सोबत राहुल शर्मा (संतूर), असा ठरलेला होता परंतु झाकीरजींच्या अकस्मीत निधनामुळे हा कार्यक्रम रद्द होणार होता. पण झाकीरजींना त्यांचा कार्यक्रम रद्द झालेला कधीच आवडत नसे. त्यामुळे ‘सा’ व ‘नी’ या संस्थेनी हा कार्यक्रम त्याच दिवशी करण्याचे ठरविले.
झाकीरजीनी दि. ७ डिसेंबर रोजी मुंबईला एक कार्यक्रम ठरवला होता, त्यामध्ये भारतातील उत्तम तरुण कलाकारां सोबत ‘फ्यूजन’करण्याचे ठरविले होते त्याप्रमाणे स्वामीनाथन सिल्व्हा गणेश (Khanjira), श्रवण समसी (Drums), कृष्णा साळुंखे (Pakhawaj) आणि ताका हिरो (संतूर- पं शिवकुमारजींचा शिष्य) असे कलाकार होते. झाकीरजींचा हेतू हा होता की ह्या गुणी तरुणांना त्यांच्या सोबत स्टेज शेअर करताना रसिकांसमोर सादर करावे, परंतु हे होऊ शकले नाही, त्यामुळे झाकीरजींची ही अपूर्ण ईच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनीच निवडलेल्या त्याच तरूण कलाकारांना घेऊन झाकीरजींचे गुरुबंधू योगेश समसी यांनी लीड करत झाकीरजींच्या अपेक्षे प्रमाणे हा कार्यक्रम सादर करण्याचे ‘सा’ व ‘नी’ या संस्थेने ठरविले आहे .
त्याप्रमाणे ‘धरोहर’ या कार्यक्रमाच्या पुर्वाधामध्ये ‘’Percussion Ensemble’’ योगेश समसी आणि हे तरुण कलाकार हे सादारीकरण करतील व नंतरच्या सत्रामध्ये राहुल शर्मा व ओजस आधीया (तबला संगत) असा सादर होईल. कार्यक्रमासाठी विध्यार्थीना तिकिटांमध्ये ५०% सुट ठेवली असून तिकिटविक्री बालगंधर्व येथे सुरु आहे व कार्यक्रमाच्या दिवशी फक्त गणेश कला येथे तिकिटे उपलब्ध असतील, याची कृपया नोंद घ्यावी.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी