पुणे, 30 जानेवारी 2024- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. रविंद्र शिंगणापूरकर, रासोयोचे संचालक प्रा. सदानंद भोसले, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडके, श्री. मुकूंद पांडे, उप कुलसचिव श्री. ज्ञानेश्वर साळूंके यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. महात्मा गांधी यांची जयंती देशभरात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त उपस्थित सर्वांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाच्या शहीदांच्या स्मरणार्थ मौन पाळले. याप्रसंगी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही