पुणे, १३/०६/२०२३: मध्यराञी ०१•०८ वाजता (दिनांक १३•०६•२०२३) अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात मार्केटयार्ड, गेट नंबर एक, हॉटेल रेवळ सिद्धी येथे आग लागल्याची वर्दि प्राप्त होताच दलाकडून गंगाधाम, कोंढवा खुर्द आणि मुख्यालयातून एक फायरगाडी व जंम्बो वॉटर टँकर रवाना करण्यात आला होता.
घटनास्थळी जवान पोहोचताच त्यांनी पाहिले की, सदर ठिकाणी दोन मजले असणारया इमारतीत हॉटेलमधे आग लागली होती. शटर आतमधून कुलूपाने बंद असून 3 कामगार पोटमाळ्यावर अडकल्याचे समजले असता जवानांनी तातडीने बोल्डकटर या अग्निशमन उपकरणाने शटर तोडून बी ए सेट परिधान करत आतमधे पोटमाळ्यावर प्रवेश केला व आगीवर पाण्याचा मारा सुरू ठेवत तिथे अडकलेल्या 3 कामगारांना जखमी व बेशुद्ध अवस्थेत तत्परतेने बाहेर काढून शासकीय रुग्णवाहिका क्रमांक १०८ मधून ससून रुग्णालयात रवाना केले आणि पुढे कार्यवाही करत आग पुर्ण विझवली. आगीचे कारण समजू शकले नाही. आग तळमजल्यावरील भटारखान्यातून सुरू झाली व मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. या ठिकाणी चार सिलेंडर बाहेर काढले.
या कामगिरीत अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथ्रुडकर, प्रदिप खेडेकर, सुनिल नाईकनवरे तसेच तांडेल मनिष बोंबले, मंगेश मिळवणे व फायरमन दिगंबर बांदिवडेकर, चंद्रकांत गावडे, आझीम शेख यांनी सहभाग घेतला.
जखमी कामगार प्राथमिक स्वरुपात समजलेली नावे:
शशिकांत गवळी
मुन्ना
संदिप
(वय अंदाज 25 ते 35)
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.