पुणे, ११/०६/२०२३: पुणे-सातारा महामार्गावर वरवे गावाजवळ झालेल्या विचित्र अपघातात शिवशाही बसमधील नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. अपघातात खासगी बसचालकाचा मृत्यू झाला. अपघातात नऊ जण जखमी झाले.
अपघातात शिवशाही बसमधील प्रवासी ऋतुजा रवींद्र चव्हाण (वय ९, रा. लक्ष्मी ग्रीन काऊंटी, एनडीए गेटजवळ, उत्तमनगर, पुणे), खासगी आराम बसचालक शिवराजकुमार आर. रंगास्वामी गौडा (वय ३४, रा. होसाहनी, हसन, कर्नाटक) यांचा मृत्यू झाला. आराम बसमधील प्रवासी रवींद्र रामा पुजारी, रत्ना रवींद्र पुजारी, वीणा प्रभाकर गौडा, हेमा अण्णा गौडा, संजू रवी गौडा, मिनाश्री गौडा, पार्वतम्मा देवगौडा, ज्योती यजरान गौडा, तसेच शिवशाही बसमधील प्रवासी सुनंदा रवींद्र चव्हाण (वय ४२) जखमी झाले आहेत. जखमींवर नसरापूर, खेड शिवापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे- सातार महामार्गावर वरवे गावाजवळ हाॅटेल सह्य्राद्रीसमोर म्हैसुरकडून मुंबईकडे खासगी आराम बस निघाली होती. त्या वेळी पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने आराम बसला धडक दिली. बस महामार्गावर उलटली. कंटेनरचालकाचा ताबा सुटल्याने तो पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसवर आदळला. शिवशाही बसमधील प्रवासी ऋतुजा चव्हाण आणि तिची आई सुनंदा (वय ४२) यांच्या डोक्यात काचा शिरल्याने गंभीर जखमी झाल्या, तसेच अपघातात खासगी बसचालक शिवराजकुमार गौडा गंभीर जखमी झाले. दोघांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. खासगी आराम बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले. राजगड पोलिसांनी या प्रकरणी कंटेनरचालक गोरख लक्ष्मण शिंदे (रा. कळंबोली, नवी मुंबई) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.