पुणे, ३ जानेवारी २०२५ : ‘ राज्यातील विमानतळांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी बैठक होणार आहे. या बैठकीत पुरंदर विमानतळाच्या विषयावर देखील चर्चा होणार आहे,’’ अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी महात्मा फुले वाड्यात मोहोळ आले होते. यावेळी आमदार हेमंत रासने आणि भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेही त्यांच्या समवेत होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,‘‘ पुरंदर विमानतळासाठीची जागा यापूर्वीच निश्चित झाली आहे. राज्यातील विमानतळाच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रातील काही अधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्या समवेत लवकरच एक बैठक होणार आहे. त्यामध्ये पुरंदर विमानतळाच्या विषयावर देखील चर्चा होणार आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागले.’’
पुण्याचे पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादावर विचारले असता मोहोळ म्हणाले,‘‘ असा कुठलाही वाद नाही. आम्ही निवडणूका एकत्र लढलो. नेत्यांमध्ये समन्वय आहे. कार्यकर्त्यांमध्ये ती समज आहे. त्या वाद नाही, चर्चाही नाही. जे पक्ष नेतृत्व निर्णय घेतो, तो आम्हाला मान्य आहे.’’ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता, मोहोळ म्हणाले,‘‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकास होत आहे. देशभरात मोदींच्या विचार पाहून अनेक नेते भाजपमध्ये नेते येत आहेत. पुण्यातही हीच परिस्थिती आहे. येणाऱ्यांचे स्वागतच आहेच. आम्ही कुणालही आमच्याकडे या असे म्हणत नाही.’’तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळाची मागणीबाबत मोहोळ म्हणाले,‘‘ आम्ही कार्यकर्ते आहोत, नेते सांगतात, ते आम्ही ऐकतो असतो. आमच्याकडे शिस्त आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्यावर त्यावर निर्णय घेऊ’’
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी