March 5, 2026

सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत फुटबॉल लीगमध्ये विद्या व्हॅली स्कूलचा दणदणीत विजय

पुणे, दि. 2 फेब्रुवारी 2026 – सेंट व्हिन्सेंट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे आयोजित सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत फुटबॉल लीगमध्ये आदित्य द्विवेदी(1,2,5,7 मि.) याने केलेल्या चार गोलांच्या जोरावर विद्या व्हॅली स्कुल संघाने हिलग्रीन स्कूल संघावर 10-0 असा दणदणीत विजय मिळवला.

सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत विदिश दायमा(9 मि.) याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर द क्लाइन मेमोरियल स्कूल संघाने डॉ. एरिन नगरवाला स्कूल संघाचा 1-0 असा पराभव केला. अण्विक लोबो(2,10 मि.) याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर सेंट व्हिन्सेंट हायस्कूल संघाने श्री श्री रविशंकर विद्या मंदिर संघाचा 3-0 असा सहज पराभव केला.

अन्य लढतीत आरव पाटील 5, 13 मि.) याने केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर लॉयला हायस्कूल संघाने सेंट पॅट्रिक्स स्कूलचा 2-0 असा पराभव केला. हिलग्रीन स्कूल संघाने नॉलेज हॅबिटॅट स्कूल(एचडीएफसी)चा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. विजयी संघाकडून विराज चौहान(2,7 मि.) याने दोन गोल तर, अद्विक राऊत(5मि.), वरदराज कांबळे(12मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

निकाल: साखळी फेरी:
द क्लाइन मेमोरियल स्कूल: 1 (विदिश दायमा 9 मि.)वि.वि.डॉ. एरिन नगरवाला स्कूल: 0;
लॉयला हायस्कूल: 2 (आरव पाटील 5, 13 मि.) वि.वि.सेंट पॅट्रिक्स स्कूल: 0;
हिलग्रीन स्कूलः 4(विराज चौहान 2,7 मि., अद्विक राऊत 5मि., वरदराज कांबळे 12मि.) वि.वि.नॉलेज हॅबिटॅट स्कूल(एचडीएफसी): 0;
सेंट व्हिन्सेंट हायस्कूल: 3 (अण्विक लोबो 2,10 मि., अरहान 14 मि.)वि.वि.श्री श्री रविशंकर विद्या मंदिर: 0;
विद्या व्हॅली स्कूल: 10 (आदित्य द्विवेदी 1,2,5,7 मि., एकांश ओझा 4,10 मि., मल्हार देशमुख 8,12 मि., सुवन घोष 11 मि., राघव काळे 15 मि.)वि.वि.हिलग्रीन स्कूल: 0;
डॉ. एरिन नगरवाला स्कुल: 1 (ऋत्विक 10 मि.) वि.वि.श्री श्री रविशंकर विद्या मंदिर: 0.