पुणे, १५ जानेवारी २०२६: अभिनेते प्रवीण तरडे यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर सलग मतदान होत असल्याने काही लोकांमध्ये थोडा कंटाळा असू शकतो; मात्र, गल्लीबोळातील स्थानिक प्रश्नांसाठी महानगरपालिका निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
तरडे म्हणाले, “निवडणुकीत कोण मित्र आणि कोण शत्रू हे कळत नाही. युद्ध सुरू असते, पण जखमा कोणाला होतात हे समजत नाही.” त्यांनी स्पष्ट केले की, गुन्हेगारांना उमेदवारी देणे कोणालाही मान्य नसावे आणि उमेदवार कोण असेल याचा निर्णय जबाबदार पक्षांनी काळजीपूर्वक घ्यावा.
प्रवीण तरडे यांनी ठामपणे सांगितले, “गुन्हेगारीवर सिनेमा बनवू शकतो, पण गुन्हेगारांना समर्थन देणार नाही.”

More Stories
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही
बजाज पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा देणार जिल्ह्यातील कृषी व पर्यटन क्षेत्राला चालना