मुंबई, 3 मार्च 2026: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित 20व्या रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उप उपांत्यपूर्व फेरीत आरूष देशपांडे, आरूष खन्ना, अबीर सुखानी, समायरा ठाकूर, इशिता पाटील यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
मुंबई येथील जीए रानडे टेनिस संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात उप उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या बिगर मानांकित आरुष देशपांडेने तेराव्या मानांकित उत्तरप्रदेशच्या अथर्व चौधरीचा 6-0, 6-3 असा तर, आरुष खन्नाने अकराव्या मानांकित दिल्लीच्या शौर्य सेहरावतचा 6-4, 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. क्वालिफायर अबीर सुखानीने दहाव्या मानांकित श्लोक आलंदचा 6-4, 4-6, 7-6(3) असा कडवा प्रतिकार केला.
मुलींच्या गटात बिगर मानांकित महाराष्ट्राच्या समायरा ठाकूर हिने आठव्या मानांकित दिल्लीच्या त्याक्षी लाथेरचे आव्हान 6-4, 6-2 असे मोडीत काढले. इशिता पाटीलने आपली राज्य सहकारी बाराव्या मानांकित आदिरा भगतचा 6-4, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली.
निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी: मुले:
आरुष देशपांडे(महाराष्ट्र) वि.वि.अथर्व चौधरी(13)(उत्तर प्रदेश)6-0, 6-3;
आरुष खन्ना(महाराष्ट्र)वि.वि. शौर्य सेहरावत(11)(दिल्ली) 6-4, 6-3;
कनिष्क(6)(दिल्ली) वि.वि.आद्विक खन्ना(महाराष्ट्र) 5-7, 6-0, 6-3;
धनुष एसएम(4)(कर्नाटक)वि.वि. पुजाला बाबू(तेलंगणा) 6-0, 6-0;
कृष्णा सिंग(उत्तरप्रदेश) वि.वि.प्रबीर पटेल 6-2, 7-6(3);
विलास तराणेकर(हरियाणा)वि.वि.प्रांशुल पुजारी(महाराष्ट्र) 6-4, 6-3;
अधिश पीएम(5)(तामिळनाडू) वि.वि.रयान वेपाकोमा 6-0, 6-0;
अबीर सुखानी(महाराष्ट्र) वि.वि.श्लोक आलंद(10)(महाराष्ट्र) 6-4, 4-6, 7-6(3);
कुमार कौटिल्य(14)(चंदीगढ) वि.वि.मंतव्य शर्मा(पंजाब)6-3, 6-2;
कबीर दहिया(3)(हरियाणा) वि.वि.धनुश महंता(आसाम) 6-0, 6-1;
मुली:
प्रियांगसी चॅटर्जी(1)(पश्चिम बंगाल) वि.वि.आरोही शर्मा(दिल्ली) 6-3, 6-1;
इवाना अरोरा(15)(पश्चिम बंगाल) वि.वि.अनन्या अरहंत(गुजरात) 6-3, 6-3;
क्रिस्टी हलोई(7)(आसाम) वि.वि.चेतना चौकी(तेलंगणा) 6-0, 6-0;
अनिक्षा गोविनोल्ला(4)(तेलंगणा) वि.वि.दर्शिका कांत(महाराष्ट्र) 6-1, 6-1;
पेराम अथर्व(9)(आंध्रप्रदेश) वि.वि.समायरा चौधरी(महाराष्ट्र) 7-5, 6-0;
समायरा ठाकूर(महाराष्ट्र) वि.वि.त्याक्षी लाथेर(8)(दिल्ली) 6-4, 6-2;
रुही सिंग(5)(कर्नाटक) वि.वि.श्रियाई वशिष्ठ(उत्तरप्रदेश) 6-0, 6-0;
काशवी कोणाकी(6)(कर्नाटक) वि.वि.आस्था केएच(कर्नाटक)6-1, 6-1;
इशिता पाटील(महाराष्ट्र) वि.वि.आदिरा भगत(12)(महाराष्ट्र) 6-4, 6-1;
असीस ब्रार(2)(पंजाब) वि.वि.गार्गी ओक(महाराष्ट्र)6-2, 6-1.

More Stories
पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत द बिग डिंक्स संघांचा दुसरा विजय
पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत गरगंटू डिस्ट्रॉयर्स, के-प्रा पिकलर्स संघांची विजयी सलामी
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026स्पर्धेत सीएमएस फाल्कन्स, परशुरामियन्स एफसी, स्निग्मय पुणे एफसी, जीओजी एफसी संघांची विजयी सलामी