पिंपरी, दि. १२ मार्च २०२५ – महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या सामाजिक, औद्योगिक आणि शैक्षणिक विकासाचे शिल्पकार होते, स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी सहकार, औद्योगिकरण, कृषी विकास आणि शिक्षण क्षेत्रात महत्वपुर्ण योगदान देऊन विकासाची पायाभरणी केली. त्यांच्या व्यापक विचारांचा वारसा चालवत महाराष्ट्र विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात त्यांच्या प्रतिमेस तसेच वल्लभनगर व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या कार्यक्रमास उप आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता विजय वाईकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तर वल्लभनगर येथील कार्यक्रमास माजी महापौर योगेश बहल आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील कार्यक्रमास माजी महापौर योगेश बहल, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. मनिषा क्षीरसागर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, मेट्रन वत्सला वाजे, समाजसेवा अधिक्षक महादेव बोत्रे, प्रशासन अधिकारी संजीव भांगले, सिस्टर इनचार्ज सविता निगडे तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

More Stories
पुणे ग्रँड टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील प्रमुख रस्त्यावरील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला