October 21, 2025

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

पुणे, ६ फेब्रुवारी २०२५ ः केंद्रीय अर्थसंकल्पात तरुणांच्या भविष्यासाठी कोणतेही ठोस निर्णय घेतले नाहीत. रोजगार निर्मितीबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने तरुणांचे भविष्य केंद्र सरकारने उद्ध्वस्त केले आहे. या विरोधात आज (ता.६) पुण्यात युवक काँग्रेसतर्फे गोपाळ कृष्ण गोखले चौकात आंदोलन केले.

युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे, अक्षय जैन, सौरभ अमराळे, उमेश पवार, कौस्तुभ नवले, प्रथमेश अबनावे, आनंद दुबे, भाविका राका, गणेश उबाळे, मेक्षाम धर्मावत, ऋषिकेश वीरकर, मती शेख, आदिनाथ केदार, विशाल कामेकर, सचिन सुडगे, सद्दाम शेख, अथर्व सोनार, हर्षद हांडे, तुषार नांदगुडे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवराज मोरे म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पात तरुणांसाठी कोणतेही ठोस धोरण नाही, रोजगाराच्या संधींविषयी कोणतेही स्पष्ट दिशानिर्देश नाहीत.हे सरकार केवळ खोटी स्वप्नं दाखवून तरुणांची फसवणूक करत आहे.

भारतीयांवर अन्याय केल्याचा निषेध
अमेरिकेतून भारतीयांना जबरदस्तीने बाहेर काढले जात आहे, पण अशा वेळी केंद्र सरकार ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप करत याचा या आंदोलनात निषेध करण्यात आला.