October 14, 2025

पीसीएफल(पुना क्लब फुटबॉल लीग) स्पर्धेत झिदाने स्वीलर्स, शुगरकेन, एएसआर स्ट्रायकर्स, ऑल स्टार्स संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुणे, 21 डिसेंबर, 2024: पुना क्लब लिमिटेड आयोजित पीसीएफएल(पुना क्लब फुटबॉल लीग) स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत झिदाने स्वीलर्स, एएसआर स्ट्रायकर्स, शुगरकेन, ऑल स्टार्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पुना क्लब फुटबॉल मैदान येथे सुरू असलेल्या मुंबई फाल्कन्स अँड टेरीरोचे मालक अमित गढोक यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आदित्य सरीन(2,18 मि.) याने नोंदवलेल्या दोन गोलांच्या जोरावर एएसआर स्ट्रायकर्स संघाने हिलयॉस ईगल्स संघाचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात झिदाने स्वीलर्स संघाने जेट्स संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. शुगरकेन संघाने हार्मनी फाल्कन्स संघाचा 3-1 असा पराभव करून आगेकूच केली. ऑल स्टार्स संघाने जिओ लिजेंड्स संघाचा 3- 2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. ऑल स्टार्स संघाकडून अविव कांजीलाल(12 मि.), डॅरियन माझदा(18 मि.)यांनी तर, जिओ लिजेंड्सकडून आदित्य गांधी(3 मि.), ओंकार कुलकर्णी(19मि.) यांनी गोल केले. सामना २-२ असा बरोबरीत सुटल्यामुळे पेनल्टी शूट पद्धतीचा अवलंब करण्यात आला. पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑल स्टार्सकडून प्रबकिरत घई यांनी गोल करून संघाला विजय मिळवून दिला. तर, जिओ लिजेंड्स कडून योहान अंकलेसारिया याला गोल मारण्यात अपयश आले.

निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
एएसआर स्ट्रायकर्स: 2(आदित्य सरीन 2,18 मि.) वि.वि.हिलयॉस ईगल्स: 0;
झिदाने स्वीलर्स: 2(राहुल हरपलानी 13मि., अक्षय चोपडा 22मि.(स्वयंगोल))वि.वि.जेट्स: 1(देवांश दिक्षित 15मि.);
शुगरकेन: 3(देवेश अगरवाल 2, 8मि., देवेश अगरवाल) पेनल्टीमध्ये वि.वि.हार्मनी फाल्कन्स: 1(हर्ष तेलंग 16मि.)(गोल चुकवला – हर्ष तेलंग);
ऑल स्टार्स: 3(अविव कांजीलाल 12 मि., डॅरियन माझदा 18 मि., प्रबकिरत घई) पेनल्टीमध्ये वि.वि.जिओ लिजेंड्स: 2 (आदित्य गांधी 3 मि., ओंकार कुलकर्णी 19 मि.) (गोल चुकवला: योहान अंकलेसारिया);