पुणे, 10 फेब्रुवारी 2023: कुंटे बुद्धिबळ अकादमी व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने व पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल(पीडीसीसी) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या केसीए-पीवायसी 10 व 14 वर्षाखालील बुद्धिबळ 2023 स्पर्धेत शहरातून 100 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथे 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना कुंटे बुद्धिबळ अकादमीच्या संचालिका मृणालिनी औरंगाबादकर यांनी सांगितले की, या स्पर्धेला सुजनील केमो इंडस्ट्रीजचे प्रायोजकत्व लाभले असून हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सहा फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत 25 हुन अधिक रेटेड खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये 7 वर्षांखालील जागतिक स्कुल स्पर्धेतील माजी विजेता आरुष डोळस, सध्याचा 8 वर्षांखालील जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेता निवान अगरवाल, आरना बेलानी, प्रथमेश शेरला आणि आर्यन राव यांचा समावेश आहे.
स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु, क्लबच्या बुद्धिबळ विभागाचे सचिव शिरीष साठे आणि क्लबच्या क्रिकेट विभागाचे विनायक द्रविड आणि सूजनील केमो इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष देसाई यांच्या हस्ते रविवार, 12 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे.
More Stories
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान
हडपसर मध्ये प्रशांत जगताप यांना मुस्लिम समाजाचे आव्हान, शरद पवारांकडे महत्वाची मागणी