June 14, 2024

एमएसएलटीए तर्फे आयोजित रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील सब-ज्युनियर टेनिस स्पर्धेस आजपासून प्रारंभ

मुंबई, 10 फेब्रुवारी 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित 13व्या रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत देशभरांतून 250 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा जीए रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे 11 ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीत रंगणार आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा आणि मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले कि, स्पर्धेतील विजेत्यांना एकूण तीन लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार असून पहिल्या फेरीपासून खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. एआयटीएचे माजी सचिव आणि एमएसएलटीएचे माजी मानद सचिव रमेश देसाई यांच्या स्मरणार्थ वार्षिक तत्वावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. देशातील विविध राज्यातून खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून आठवडाभर चालणाऱ्या या स्पर्धेला टेनिस हब आणि एनर्झल यांचा पाठिंबा लाभला आहे.

कुमार गटातील खेळाडूंमध्ये टेनिसचा अधिकाधिक प्रसार व्हावा या हेतूने रमेश देसाई यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 11 व 12 फेब्रुवारी रोजी, तर मुख्य ड्रॉला 13 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री वैशाली कन्नमवार यांची निवड करण्यात आली असून मनोज वैद्य स्पर्धा संचालक म्हणून काम पाहणार आहेत.

खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
मुले: 1. विवान म्रिधा(राजस्थान), 2. विराज चौधरी (दिल्ली), 3. हीत कंडोरिया (गुजरात), 4.स्मित उंद्रे (महा), 5. युवान गर्ग(उत्तरप्रदेश), 6. आरव जाखर (हरियाणा), 7. चांदोग्या पाठक(आसाम), 8. रॉनी विजय कुमार(तामिळनाडू);

मुली: 1. श्राव्या सौंदर्या नुम्बुरी (तामिळनाडू), 2. सृष्टी किरण (कर्नाटक), 3. कार्तिका पद्मकुमार (कर्नाटक), 4. नीशा एन्जा (तामिळनाडू), 5. वसुंधरा बालाजी (तामिळनाडू), 6. आशी कश्यप( हरियाणा), 7. जेन्सी कानबर (गुजरात), 8. श्री अक्षा पेनुमेस्टा (तेलंगणा).